शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या संघटनकौशल्याची चाचपणी

By admin | Updated: December 2, 2015 00:40 IST

निमित्त अमृतमहोत्सवाचे : जयंत पाटील यांनी दिल्या टिप्स्

सांगली : राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या संघटनकौशल्याची चाचपणी सुरू झाली आहे. २0 रोजी होणाऱ्या पुण्यातील अमृतमहोत्सवी कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांना संघटित करून घेऊन येण्याच्या सूचना देतानाच, यातून पक्षीय ताकद वाढविण्याची संधी पदाधिकाऱ्यांना मिळणार असल्याचे मत आ. जयंत पाटील यांनी यावेळी मांडले. सांगलीतील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात अमृतमहोत्सवी कार्यक्रम तसेच जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांच्या ताकदीची चाचपणीही केली. प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून कार्यक्रमांचे नियोजन आणि लोकांचे संघटन याविषयीची मते जाणून घेतली. पदाधिकारी कितपत तयारी करू शकतात, याचा अंदाज त्यांनी घेतला. पक्षाचे जिल्ह्यातील दहा तालुकाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, महिला आघाडी आणि सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना त्यांनी, लोकांना पुण्यातील कार्यक्रमासाठी एकत्रित आणण्याची सूचना दिली. पक्षीय कार्यक्रम असला तरी यानिमित्ताने लोकांशी जोडण्याची व संघटनकौशल्य पणास लावण्याची संधी पदाधिकाऱ्यांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील दहा हजार लोक पुण्यातील कार्यक्रमाला जाण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. बैठकीस आ. सुमनताई पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, सुरेश पाटील, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, वैभव शिंदे, शरद लाड, लीलाताई जाधव, बाबासाहेब मुळीक, बी. के. पाटील, ताजुद्दीन तांबोळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)