शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

चर्मकार समाजाचा गलेफ अर्पण

By admin | Updated: May 25, 2014 00:47 IST

भाविकांची गर्दी : मीरासाहेब दर्गा उरूसास प्रारंभ, आजपासून रंगणार संगीत महोत्सव

 मिरज : मिरजेतील प्रसिध्द मीरासाहेब दर्ग्याच्या उरूसास आज शनिवारपासून सुरुवात झाली. पहाटे चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण करण्यात आला. रविवारी गंधलेप विधी व संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ संगीत सभेस प्रारंभ होणार आहे. मीरासाहेब दर्ग्याचा ६३९ व्या उरूसास आज सुरुवात झाली. पहाटे सहा वाजता मानकर्‍यांच्या हस्ते चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण करण्यात आला. काँगे्रस नेते अ‍ॅड. सी. आर. सांगलीकर, दयाधन सोनवणे, सिध्दार्थ जाधव आदी उपस्थित होते. गलेफ अर्पण कार्यक्रमावेळी दर्ग्यात हिंदू-मुस्लिम भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गलेफसमोर शाहिरांनी कला सादर केली. त्यानंतर महिलांनी गलेफ अर्पण केला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सकाळी पोलीस दलाचा व दुपारी महापालिकेतर्फे गलेफ अर्पण करण्यात आला. रविवारी उरूसाच्या दुसर्‍यादिवशी गुलबर्गा येथील सुफी संत अफसरबाबा व मुस्तफाबाबा यांच्या हस्ते गंधलेप विधी होणार आहे. सकाळी दहा वाजता दर्गा पटांगणातील चिंचेच्या झाडाखाली संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ संगीत सभेस प्रारंभ होणार आहे. पहिल्यादिवशी किराणा घराण्यातील दिग्गज आपली संगीत सेवा अर्पण करणार आहेत. उरूसाच्या पहिल्यादिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. (वार्ताहर)