शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी सीडीपीओंचा कार्यभार काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : तासगाव पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्पाचे प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी एस. बी. बुधावले यांच्याकडील कार्यभार काढून सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी यु. व्ही. चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे. अन्य दोन सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकाºयांचीही बदली करण्यात आली आहे, तर सायकल वाटप घोटाळ्याचा चौकशी अहवाल बुधवारी मिळणार असल्याचे गटविकास ...

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : तासगाव पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्पाचे प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी एस. बी. बुधावले यांच्याकडील कार्यभार काढून सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी यु. व्ही. चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे. अन्य दोन सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकाºयांचीही बदली करण्यात आली आहे, तर सायकल वाटप घोटाळ्याचा चौकशी अहवाल बुधवारी मिळणार असल्याचे गटविकास अधिकारी अरुण जाधव यांनी सांगितले.महिला व बालकल्याण विभागामार्फत सायकल अनुदान वाटपात झालेला नियमबाह्य कारभार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. या प्रकरणानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी गटविकास अधिकारी अरुण जाधव यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गटविकास अधिकाºयांनी बालविकास प्रकल्प अधिकाºयांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. बुधवारी चौकशी अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र या अहवालात त्रुटी असल्याने सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गुरुवारी हा अहवाल सादर होणार आहे.दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी बाल विकास प्रकल्पातील अधिकाºयांची बदली केली आहे. तासगाव पंचायत समितीकडील एकात्मिक बालविकास प्रकल्पाचा प्रभारी कार्यभार असणाºया वाळवा पंचायत समितीकडील एस. बी. बुधावले यांचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्याऐवजी सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी यु. व्ही. चव्हाण यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे. सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी डी. जी. परनाकर यांची आटपाडीला, तर सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी सी. एल. पटेल यांची कडेगाव प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.पर्यवेक्षीय त्रुटीला जबाबदार कोण?सायकल वाटप अनुदानासाठी सादर झालेल्या प्रस्तावात अनेक पर्यवेक्षीय त्रुटी आहेत. या विभागातील अधिकाºयांनी केवळ संबंधित बदली झालेल्या कनिष्ठ सहाय्यकावर सर्व जबाबदारी सोपवून नामानिराळे राहण्याचे काम केले आहे. सायकल वाटपासाठीचे प्रस्ताव निकषानुसार पूर्ण करून, सायकल खरेदीची खातरजमा करून नंतर अनुदानासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविणे अपेक्षित होते. मात्र या प्रस्तावात अनेक त्रुटी कायम ठेवून लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे या त्रुटीला केवळ एक कर्मचारी जबाबदार नसून अन्य अधिकारीही जबाबदार असल्याची चर्चा आहे.