शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'सांगली महापालिका निवडणुकीत चंद्रकांतदादा पैशांचा पाऊस पाडणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 17:21 IST

शिवसेना खासदार गजाजन किर्तीकर यांच्याकडून भाजपचा समाचार

सांगली : भाजपकडे जनाधार असलेलं लोक नसल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पैशांचा पाऊस पाडतील, अशी टीका शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केली. पत्रकारांशी संवाद साधताना किर्तीकर यांनी ही टीका केली. लवकरच सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत.'शिवसेनेकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. जनता आमच्यासोबत आहे. मात्र भाजप उसन्या उमेदवारांच्या जीवावर अवसान आणलं आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडतील,' असे किर्तीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. 'आमच्याकडे जनाधार असलेले लोक आहेत. आम्ही तत्त्वानं सांगली, मिरज, कुपवाडमधील निवडणुका लढवणार आहोत. लोक आमच्यासोबत राहतील, असा विश्वास आम्हाला आहे. मात्र भाजपकडे यातील काहीच नसल्यानं पैशांचा पाऊस पडेल. चंद्रकांत पाटीलच या सर्व गोष्टी करणार आहेत. मात्र तरीही त्यांच्या पदरात फारसे काही पडणार नाही,' असं किर्तीकर यांनी म्हटलं.भाजपनं राज्यात अनेक ठिकाणी उसन्या उमेदवारांचा आधार घेऊन निवडणुका लढवल्या, अशी टीका किर्तीकरांनी केली. 'भाजपचं उसन्या उमेदवारांचं राजकारण फार काळ टिकणार नाही. आगामी महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे. आमच्यासोबत कोणी नसलं, तरी आम्हाला कधी एकाकी वाटत नाही. आम्ही लढायला सक्षम आहोत. भाजप उपोषणाचा भंपकपणा करीत आहे. अनंत गीते मंत्री असल्यामुळे भाजपच्या उपोषणावेळी उपस्थित होते. मात्र शिवसेनेचा त्यांच्या आंदोलनाला पाठींबा नाही, असंही किर्तीकरांनी म्हटलं. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, आ. अनिल बाबर, पृथ्वीराज पवार, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, नगरसेवक शेखर माने उपस्थित होते.'कधीकाळी शिवसेनेशी राजू शेट्टी यांचे चांगले संबंध होते. मात्र त्यांनी आता काँग्रेसशी सलगी केली आहे. त्यांच्यासाठी गेल्यावेळी हातकणंगले मतदारसंघात आम्ही उमेदवार उभा केला नव्हता. मात्र आता शेट्टी स्वार्थापोटी काँग्रेसच्या बाजूनं गेले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यासाठी आम्ही जागा सोडणार नाही, असं किर्तीकर यांनी स्पष्ट केलं. केडगावमधील शिवसैनिक हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. 'अहमदनगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या खून प्रकरणाच्या तपासात शासनाचं योग्य पाठबळ मिळत आहे. योग्य दिशेने तपासही सुरू आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत केलेली वाढ आणि शिवसैनिकांवरील हल्ले याचा काहीही संबंध नाही. शिवसैनिकांना कोणाचीही भीती वाटत नाही. आम्ही कोणत्याही संघर्षास सक्षम आहोत,' असं किर्तीकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील