शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादा आता जळगावचेही पालकमंत्री

By admin | Updated: December 30, 2016 01:05 IST

सांगली-सुभाष देशमुख : सदाभाऊ साताराचे सहपालकमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याऐवजी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले आहे. त्याशिवाय पाटील यांच्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्रिपद कायम राहील. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे, तर सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्रिपद सदाभाऊ खोत यांच्याकडे देण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यांदाच सहपालकमंत्रिपद निर्माण केले आहे. ज्या दोन मंत्र्यांमध्ये जिल्ह्याच्या कारभाराबाबत संघर्ष घडू शकतो त्या दोघांचेही समाधान अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी केले आहे.एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना ते जळगाव आणि बुलडाणाचे पालकमंत्री होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर या दोन्हींचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री फडणवीस यांनी फुंडकर यांच्याकडे दिले. फुंडकर हे खडसे यांचे निकटवर्ती मानले जातात. आता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर फुंडकर यांच्याकडून जळगावचे पालकमंत्रिपद काढण्यात आले आहे. जळगावच्या राजकारणात खडसे विरुद्ध जलसंपदामंत्री गिरीश महाजन या दोघांच्या संघर्षाचा फटका पक्षाला बसू नये आणि संघर्षाच्या प्रसंगात मध्यस्थी व्हावी यासाठी मुद्दाम चंद्रकांतदादा पाटील यांना पालकमंत्रिपद दिल्याचे म्हटले जात आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते हे आतापर्यंत परभणीचे पालकमंत्री होते. आता त्यांना उस्मानाबादचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे उस्मानाबादचे सहपालकमंत्री असतील.गेल्या विस्तारात राज्यमंत्री झालेले भाजपचे मदन येरावार (पान १० वर)