जत : शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या व त्यांच्या समस्या सोडवण्याऱ्या प्रोटान विंग संघटनेच्या जत तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत बंडगर यांची निवड झाली आहे. संघटनेची बैठक नुकतीच ऑनलाइन पार पडली.
या बैठकीमध्ये प्रोटानची नवी तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. या बैठकीत प्रोटानचे जिल्हाध्यक्ष सदाशिव वारे, पुणे प्रोटानचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, जिल्हा सहकोषाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, कार्यकारी सदस्य मल्लिकार्जुन कोळी, प्रसिद्ध लेखक मच्छिंद्र ऐनापुरे, बामसेफ सांगलीचे उपाध्यक्ष सचिन कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जत तालुका प्रोटान कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत बंडगर यांची निवड केली. या कार्यकारिणीमध्ये नियुक्त झालेले नवीन पदाधिकारी पुढीलप्रमाणे कार्याध्यक्ष रणवीर कांबळे, उपाध्यक्ष अंकुश भंडारे, उपाध्यक्ष श्रीकांत माळी, महासचिव नवनाथ संकपाळ, सहसचिव जयंत गेजगे, सहसचिव सुरेशकुमार नरुटे, कोषाध्यक्ष-राजेश राठोड, सह कोषाध्यक्ष आनंदराव पांढरे, कार्यकारी सदस्य थोराप्पा कांबळे, कार्यकारी सदस्य सुखदेव माळी, कार्यकारी सदस्य अंकुश कांबळे, कार्यकारी सदस्य राजू आटपाडकर.