शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आमदारांपुढे मताधिक्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:34 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गतवेळी भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्याची नोंद करीत कॉँग्रेसचा बालेकिल्ला ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गतवेळी भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्याची नोंद करीत कॉँग्रेसचा बालेकिल्ला हस्तगत केला होता. यंदा गटबाजीने हा पक्ष त्रस्त आहे. काही आमदारांनीच सुरुवातीला खासदारांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शविला होता. पक्षातील वातावरण शांत झाले असले तरी, आमदारांसमोर आता त्यांच्या मतदारसंघातील मताधिक्य टिकविण्याचे आव्हान राहणार आहे.सांगली लोकसभा मतदारसंघातील गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहिला तर, भाजपचा आलेख चढता राहिला आहे. २00९ च्या निवडणुकीतही त्यांच्याकडे तीन आमदार होते आणि सध्याही तीनच आहेत, मात्र खासदारकीसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या संस्थाही भाजपने काबीज केल्यामुळे त्यांची ताकद गेल्या पाच वर्षात आणखी वाढली आहे. यंदाच्या निवडणुकीत ही ताकद अबाधित ठेवण्याचे आव्हान आहे. खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देऊ नये म्हणून काही आमदारांनीच विरोध केला होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हा वाद मिटला आहे. तरीही आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप आणि घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांना त्यांच्या मतदारसंघातील मताधिक्य टिकविण्याचे आव्हान राहणार आहे. या मताधिक्यावरच भाजपच्या उमेदवाराचे गणित अवलंबून आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगलीची जागा मिळाली असून, आघाडी धर्म पाळण्यासाठी राष्टÑवादीचे आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील तसेच कॉँग्रेसचे आ. विश्वजित कदम यांनाही त्यांच्या मतदारसंघातील मताधिक्य आघाडीच्या उमेदवाराला मिळवून देण्याचे आव्हान असणार आहे.चित्र बदलेल का? कसे?सांगली जिल्ह्यात भाजपने गेल्या दहा वर्षांत मोठी मुसंडी मारली आहे. मागील निवडणुकीत मोदी लाट होती, ती ओसरल्याचा राजकीय तज्ज्ञांचा सूर आहे.मोदींच्या प्रभावाशिवाय सांगलीतील भाजपला ताकद दाखविण्याची वेळ आली आहे.मतदारसंघातील चित्र तसेच राहणार की बदलणार याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत. तुल्यबळ उमेदवारांमुळे यंदा भाजपला ही निवडणूक फारशी सोपी राहिलेली नाही.विधानसभांचे निकाल 2009जागा भाजप काँग्रेस राष्टÑवादी बसप इतरसांगली 45% 39%5% 0% 1% 15%मिरज 56% 24% 0%% 1% 19%पलूस-कडेगाव 0% 58% 0% 1% 39%खानापूर 0% 42% 0% 1% 57%तासगाव-क.म. 39% 0% 63% 2% 35%जत 39% 0% 36% 1%24%विधानसभांचे निकाल 2014जागा भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी इतरसांगली 41% 34% 18% 2% 5%मिरज 51% 16% 11% 6% 45%पलूस-कडेगाव 425% 54% 1% 0.5% 2.5%खानापूर 20% 24% 33% 18% 5%तासगाव-क.म. 42% 2% 1% 53% 2%जत 43% 32% 1% 18% 6%