शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

मिरजेत काँग्रेसचा उमेदवार निवडीचेच आव्हान !

By admin | Updated: June 9, 2014 00:57 IST

मताधिक्यामुळे भाजपची आघाडी : मिरज ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार

सदानंद औंधे ल्ल मिरजमिरज विधानसभा मतदारसंघात काँगे्रस पक्षातर्फे इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मिरज विधानसभा मतदार संघात भाजपला सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याने भाजपला आव्हान देऊ शकेल, असा उमेदवार आताच जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेस नेते करीत आहेत.मिरज शहर व तालुक्यातील सहकारी संस्था, सोसायट्या, ग्रामपंचायतीत काँगे्रसचे वर्चस्व आहे. काँग्रेसच्या तुलनेत भाजपची ताकद अल्प असली, तरी प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपने काँग्रेसवर मात केली आहे. मिरज शहरात अल्पसंख्यांक व दलित मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने येथे काँग्रेसची ताकद मोठी आहे. मिरज विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार निवडून येत असले, तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची मताधिक्याची परंपरा यावेळी प्रथमच खंडित झाली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत सरशी होण्यासाठी काँग्रेसला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात गतवेळी निवडणुकीपूर्वी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सुरेश खाडे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. गत विधानसभा निवडणुकीत मिरज पूर्व भागात राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे व त्यांच्या समर्थकांनी सुरेश खाडे यांना मदत केली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत झालेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत काँग्रेसने वर्चस्व राखले. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीत शहरात व ग्रामीण भागात भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी तब्बल ४६ हजारांची आघाडी घेऊन काँग्रेसचा बालेकिल्ला भुईसपाट केला. मिरज पूर्वभागात राष्ट्रवादीचे नेते अजितराव घोरपडे यांची साथ व नरेंद्र मोदी यांची मिरजेत झालेली प्रचारसभा यामुळे भाजपला मिरजेत मोठी आघाडी मिळाली. येत्या चार महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पिछाडी भरुन काढणे हे काँगे्रससमोरील मोठे आव्हान आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आ. सुरेश खाडे यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र काँग्रेसचा उमेदवार निश्चित नसल्याने काँग्रेसच्या आघाडीवर सामसुम आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आनंदा डावरे, उद्योजक अ‍ॅड. सी. आर. सांगलीकर, प्रा. सिध्दार्थ जाधव, बाळासाहेब होनमोरे, दयाधन सोनवणे, जि. प. सदस्य प्रकाश कांबळे हे काँग्रेसतर्फे इच्छुक कार्यकर्ते आहेत. अजितराव घोरपडे समर्थक तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार, आम आदमी पक्षातर्फे संगीता दणाणे यांच्यासह अन्य इच्छुक उमेदवार असले, तरी भाजप विरुध्द काँग्रेस अशीच लढत रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे भाजप कार्यकर्त्यांत उत्साह आहे. राष्ट्रवादी नेत्यांच्या सोबतीने पुन्हा एकदा विधानसभेत विजय मिळविण्यासाठी आ. सुरेश खाडे यांची व्यूहरचना सुरू आहे.