शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:29 IST

विटा : खानापूर तालुक्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून, मंगळवारी विटा शहरासह तालुक्यात २०७ नवीन कोरोना रुग्णांची ...

विटा : खानापूर तालुक्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून, मंगळवारी विटा शहरासह तालुक्यात २०७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, प्रशासनाची दमछाक झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने मंगळवारी तालुक्यातील भाग्यनगर, वलखड माहुली व घानवड या चार गावांत भेट देऊन ६ कंटेन्मेंट झोन तयार केले, तर होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना घराबाहेर न पडण्याच्या सक्त सूचना केल्या.

विटा शहरास खानापूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विटा व तालुक्यात असलेल्या कोविड रुग्णालयात सध्या बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकांना उपचार घेणे जिकिरीचे झाले आहे. शासनाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली आहे. त्यामुळे ११ वाजेपर्यंत कोणत्याही नियमाचे पालन न करता भाजी मंडईसह अन्य ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आणणे मुश्‍कील झाले आहे. परिणामी रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रशासनासह आरोग्य विभागही चांगलाच हादरून गेला आहे.

मंगळवारी विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोराेनाचे नवीन २०७ रुग्ण आढळून आले. सध्या ८९१ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने दररोज प्रबोधन केले जात असले तरी लोकांची गर्दी कमी होत नाही. त्यामुळे विटा शहरासह तालुक्यात कमीत कमी ७ दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर करण्याची मागणी नागरिकांतून वाढू लागली आहे.

दरम्यान, मंगळवारी प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांच्यासह पथकाने भाग्यनगर, माहुली, वलखड, घानवड आदी चार गावांत भेटी दिल्या. त्यावेळी स्थानिक ग्राम दक्षता समितीशी चर्चा करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची व शासनाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रशासनाने भाग्यनगर येथे १, माहुली येथे ३ व वलखड येथे २ असे ६ कंटेन्मेंट झोन तयार केले. तसेच होम आयशोलेशनमध्ये असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना योग्य त्या सूचना दिल्या.

फोटो : २७ विटा २..३..४

ओळ : खानापूर तालुक्यातील माहुली येथे प्रांताधिकारी संतोष भोर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्यासह प्रशासनाने भेट देऊन पाहणी केली.

फोटो कॅप्शन ०३ : खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, भाग्यनगर आदी गावात प्रशासनाने कंटेन्मेंट झोन तयार केले आहेत.