शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग सभापतीसाठी पालिकेत रस्सीखेच

By admin | Updated: April 12, 2016 00:39 IST

१८ एप्रिल रोजी निवडी : राष्ट्रवादीची भूमिका निर्णायकी; शनिवारी अर्ज दाखल होणार

 सांगली : महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांच्या सभापतींची १८ रोजी निवड होणार आहे. या पदांसाठी सत्ताधारी काँग्रेसमधील मदनभाऊ गट व उपमहापौर गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधकांना हातीशी धरून जास्तीत जास्त सभापतीपदे आपल्या गटाच्या पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समिती सदस्यांच्या बैठकीत सभापती पदांची निवड होईल. त्यासाठी १६ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. सध्या चार प्रभाग समित्यांपैकी तीन सभापतीपदे काँग्रेसकडे, तर एक सभापतीपद स्वाभिमानी आघाडीकडे आहे. गेल्यावेळी काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीने सभापती निवडीत आघाडी केली होती. आता मात्र पालिकेतील राजकीय चित्र पालटले आहे. काँग्रेसमध्येच मदनभाऊ व उपमहापौर असे दोन गट पडले आहेत. उपमहापौर गटाने स्वाभिमानी आघाडीशी दोस्ताना वाढविला आहे. प्रभाग सभापती पदासाठी दोन्ही गट एकत्र येऊन मदनभाऊ गटाला शह देण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रभाग समिती एकमध्ये काँग्रेसचे प्राबल्य आहे. या समितीत मदनभाऊ गटाचे ५, उपमहापौर गटाचे ४, स्वाभिमानीचे ३ व राष्ट्रवादीचे ५ सदस्य आहेत. या प्रभागात उपमहापौर गट व स्वाभिमानीचे संख्याबळ सात आहे. मदनभाऊ व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली, तर उपमहापौर गटाला शह बसू शकतो. प्रभाग समिती दोनमध्ये मदनभाऊ गटाचे ८, उपमहापौर गटाचे २, स्वाभिमानीचे ५, तर राष्ट्रवादीचे ७ सदस्य आहेत. स्वाभिमानीच्या पाच सदस्यांपैकी २ सदस्य हे भाजपचे आहेत. ते सध्या तरी उपमहापौर गटासोबत नाहीत. त्यामुळे या प्रभागात मदनभाऊ गटाला वर्चस्वाची संधी आहे. प्रभाग समिती तीनमध्ये राष्ट्रवादीची सदस्यसंख्या अधिक आहे. राष्ट्रवादीचे ७, मदनभाऊ गटाचे ५, उपमहापौर गटाचे ३, तर स्वाभिमानीचे २ सदस्य आहेत. सध्या हा प्रभाग स्वाभिमानी आघाडीकडे आहे. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कांचन भंडारी यांना सभापती पदाची लॉटरी लागू शकते. त्यासाठी त्यांना मदनभाऊ गटाची साथ घ्यावी लागेल. उपमहापौर व स्वाभिमानीला सभापतीपद मिळू नये, अशी मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रभाग चारमध्ये काँग्रेसचे एकहाती वर्चस्व आहे. इथे उपमहापौर गटाचे दोन व स्वाभिमानीचा एक सदस्य असून तो भाजपचा आहे. तसेच मदनभाऊ गटाकडे १२ सदस्य आहेत. त्यामुळे सर्व विरोधक एकत्र झाले तरी, मदनभाऊ गटाला धोका नाही. गेली दोन वर्षे सभापतीपद सांभाळणाऱ्या मालन हुलवान यांनाच पुन्हा संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. सभापती पदासाठी इच्छुकांची संख्या पाहता, कुणाला संधी मिळते, याची उत्सुकता लागली आहे. (प्रतिनिधी)जयश्रीतार्इंचा निर्णयप्रभाग समिती सभापती पदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. पदाचा अंतिम निर्णय जयश्रीताई मदनभाऊ पाटील याच घेणार आहेत. त्यांच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.