शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

सभापती, गटनेते ‘स्थायी’तून आऊट

By admin | Updated: August 31, 2014 00:14 IST

सांगली महापालिका : स्वाभिमानी आघाडीचे दोन्ही सदस्य बाहेर

सांगली : महापालिका स्थायी समिती सभापती राजेश नाईक, गटनेते किशोर जामदार यांच्यासह आठ सदस्य आज (शनिवारी) स्थायी समितीमधून निवृत्त झाले. कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन, तर स्वाभिमानीच्या दोन सदस्यांचा यात समावेश आहे. राजेश नाईकही बाहेर पडल्याने आता सभापती व सदस्य निवडीचा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या स्थायी समितीमधून सोळापैकी आठ सदस्यांची आज सोडतीद्वारे निवृत्ती जाहीर झाली. महापालिकेतील सत्ता स्थापनेनंतर आठ सदस्यांना दोन वर्षाची, तर आठ सदस्यांना वर्षाकरिता संधी मिळत असते. ही संधी कोणाला किती काळ मिळणार, या गोष्टी सोडतीवर अवलंबून असतात. त्यामुळे शनिवारी स्थायी समितीची विशेष सभा आयोजित केली होती. आयुक्त अजिज कारचे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. सोडतीत सभापती राजेश नाईक, सत्ताधारी पक्षाचे गटनेते किशोर जामदार, वंदना कदम, धीरज सूर्यवंशी, उमेश पाटील, बाळासाहेब गोंधळी, मैनुद्दीन बागवान, शुभांगी देवमाने यांच्या निवृत्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. निवृत्त सदस्यांमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन, तर स्वाभिमानी आघाडीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे.नव्याने त्यांच्याजागी नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांमध्येही पक्षनिहाय संख्याबळ तसेच ठेवण्यात येणार आहे. कुपवाडला प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून कुपवाडचे प्रशांत पाटील यांनी फिल्डिंग लावली आहे. स्थायी समितीमध्ये कॉँग्रेसचे नऊ, राष्ट्रवादीचे पाच आणि स्वाभिमानी आघाडीचे दोन सदस्य होते. आता राहिलेल्या समिती सदस्यांमध्ये कॉँग्रेसचे सहा, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. सभापती नाईक यांना विधानसभा निवडणूक संपेपर्यंत मुदतवाढ देण्याच्या हालचाली सुरू होत्या, मात्र त्यांचीच चिठ्ठी निघाल्याने आता त्यांच्या मुदतवाढीलाही ‘ब्रेक’ लागला आहे. नव्याने आठ सदस्य निवडताना आता सभापती पदाचीही निवड करावी लागणार आहे. महिलांना सभापतीची संधी नाहीस्थायी समिती सभापतीपदासाठी प्रमुख दावेदारांमध्ये अनारकली कुरणे या महिला सदस्याही असल्या तरी आजवर महापालिकेच्या इतिहासात कधीही हे पद महिलेला मिळाले नाही. जर यावेळी हे पद त्यांना मिळाले तर त्या स्थायीच्या पहिल्याच महिला सभापती ठरू शकतात. (प्रतिनिधी)