वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णांनी सातारा जेलच्या १८ फूट उंचीवरून मारलेल्या धाडसी उडीला शुक्रवारी ७७ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीत हा एक धाडसी प्रसंग होता. सापडले असते तर पोलिसांच्या गोळीला बळी पडले असते. या शौर्याला लाल सलाम म्हणून हुतात्मा संकुलाच्यावतीने १० सप्टेंबर हा शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो, असे प्रतिपादन सागर चिखले यांनी केले.
वाळवा येथील जिजामाता विद्यालयात क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी सातारा जेल फोडलेल्या घटनेस ७७ वर्षे पूर्ण झाली. याबद्दल शौर्य दिन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करताना चिखले बोलत होते. त्यांनी या रोमहर्षक प्रसंगाचे सविस्तर वर्णन केले. मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
चेंडके म्हणाल्या, ‘‘आजच्या तरुणांनी क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा यांचे विचार जोपासले पाहिजेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. नागनाथअण्णांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.