शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST

सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने यंदा शिवजयंती साजरी करताना सर्वच मंडळांनी नियमांचे पालन करावे. रॅली, मिरवणुका न काढता ...

सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने यंदा शिवजयंती साजरी करताना सर्वच मंडळांनी नियमांचे पालन करावे. रॅली, मिरवणुका न काढता रक्तदान शिबिर, स्वच्छतेबाबत जनजागृतीचे उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी मंगळवारी केले.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्यावतीने शहरातील विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, उपअधीक्षक अजित टिके, अशोक वीरकर उपस्थित होते.

यावेळी प्रमोद इनामदार, नितीन गोंधळे, आसिफ बावा, उत्तम कांबळे, सदानंद कबाडगे, ऋषिकेश पाटील, संभाजी पाटील, डाॅ. संजय पाटील, इरफान बारगीर, अशोक माने यांनी मते मांडली.

शासनाने यंदा शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याची सूचना केली आहे. पोवाडा व इतर सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुकांवर बंधने आहेत. १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी केली जाणार आहे. मंडळांनी प्रतिबंधक उपाययोजना, स्वच्छतेबाबत जनजागृती करून आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, उत्सवाला कुठेही गालबोट लावू नये, अशा सूचनाही पोलिसांच्यावतीने देण्यात आल्या.

चौकट

मिरवणुकांना परवानगी द्या

बहुतांश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी, यंदा शिवजयंती मिरवणुकांना परवानगी देण्याची मागणी बैठकीत केली. राजकीय पक्षांच्या मेळाव्यात कुठेही बंधने नाहीत. पण व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंधने घातली आहेत. ध्वनिक्षेपक, मिरवणुकांना बंदी आहे. या अटी शिथिल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.