लेंगरे येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे गावात नियमांचे पालन व्हावे व रमजान ईद साधेपणाने साजरी व्हावी याबाबत मुस्लिम समाजातील प्रमुखांसोबत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहेत. याही वर्षी प्रशासनाकडून सर्वच धार्मिक कार्यक्रमावर निर्बंध घातले आहेत. रमजान ईद घरीच राहून साजरी करा. पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग सतर्क राहून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत. लेंगरे व परिसरातील सर्व मुस्लिम समाज बांधवांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संतोष डोके यांनी केले.
यावेळी पोलीस हवालदार अमोल पाटील, मारुती हजारे, मौलाना नसीर मुजावर, सैफ देसाई, नवाज पिरजादे, दस्तगीर आतार, याकब पिरजादे, विनायक शिंदे, आदी उपस्थित होते.