शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘सीसीटीव्ही’लाही चोरांचे आव्हान

By admin | Updated: November 6, 2014 23:01 IST

घटना वाढल्या : सांगली जिल्ह्यात वर्षात वीस लाखांची रोकड पळवली

अंजर अथणीकर - सांगली -बँकांमध्ये व बाहेर असणारे सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ असा प्रकार होऊन बसला आहे. हलक्या दर्जाचे कॅमेरे बसविल्याने पोलिसांच्या तपास कामात अडथळे निर्माण झाले असून, काही ठिकाणी अनेकदा आवाहन करूनही बाहेरील बाजूस कॅमेरे बसविण्याबाबत बँकांनी हात अखडता घेतला आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे. गेल्या वर्षभरात वीस लाखांहून अधिक रोकड चोरट्यांनी बँकांसमोरून लंपास केली आहे. गेल्या चार-पाच वर्षात सर्वच बँका, वित्तीय संस्था आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात झाली आहे. कॅशियरसह आतील बाजूस चांगल्या प्रकारचे कॅमेरे बसविले जातात, मात्र इमारतीच्या बाहेरील बाजूस बँका दर्जेदार कॅमेरे बसवत नाहीत. काही ठिकाणी तर इतक्या उंचीवर कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत की, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे चेहरेही स्पष्ट दिसत नाहीत. ‘बॅक अप्’मध्ये जाऊन हे स्पष्ट झाले असले तरी, त्याची काळजी बॅँका घेताना दिसत नाहीत. गेल्या वर्षभरात सांगली, विटा व इस्लामपूर शहरामध्ये सात ते आठ बॅगा पळविण्याचे प्रकार झाले. यामध्ये सुमारे वीस लाखांहून अधिक रोकड पळविण्यात आली. या बॅगा बँकांसमोरून पळविण्यात आल्या, मात्र एकाही कॅमेऱ्यामध्ये चोरट्यांचे चेहरे दिसले नाहीत. बाहेरील बाजूला कॅमेरा बसविणे आमची जबाबदारी नाही, असे सांगून बँक प्रशासन आपली जबाबदारी टाळत आहेत. त्याचबरोबर अनेकदा आवाहन करुनही बँक चालकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. सांगलीतील पुष्पराज चौकामध्ये महिन्यापूर्वीच एका व्यापाऱ्याची पाच लाखांची बॅग पळविण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी संबंधित बँक चालकांना इमारतीबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना केल्या होत्या. आता काल, बुधवारी एका व्यापाऱ्याची ८६ हजारांची बॅग तेथूनच पळविण्यात आली असताना, चोरट्यांचे चेहरे कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व बँकांना सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँका केवळ आतील बाजूस कॅमेरे बसवतात, यामुळे समस्या निर्माण होतात. यापुढे इमारती बाहेरही कॅमेरे बसवले पाहिजेत. आम्ही तीन महिन्याला एकदा ‘बॅकअप’ घेऊन त्याचे रेकॉर्डिंग कंट्रोल रूमला देतो. - लक्ष्मीकांत कट्टी, बँक आॅफ इंडियाचे करन्सी (रोकड) अधिकारीसर्व बॅँकांना सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देऊनही त्याचे पालन केले जात नाही. यापूर्वी चोरी झालेल्या ठिकाणीही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. आता पुन्हा बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कॅमेरे बसवण्यासाठी सूचना त्यांना देण्यात येतील. - प्रकाश गायकवाड, पोलीस उपअधीक्षक, सांगलीसांगली, इस्लामपूर, विट्यातून सात बॅगा लंपासगेल्या वर्षभरातून सांगलीमध्ये बँकांसमोरुन तीन बॅगा, तर विट्यामध्ये तीन व इस्लामपूरमध्ये एक बॅग पळविण्याचा प्रकार झाला आहे. यामधून सुमारे वीस लाखांची रोकड पळविण्यात आली आहे. यातील एकही चोरटा पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या चोरट्यांचे फुटेज मिळविण्यातही पोलिसांना यश आलेले नाही.