जत : येथील सीमा सुरक्षा दलातील गणपत ज्ञानू मासाळ (वय ४३, रा. मोरे कॉलनी, जत) या जवानाचा नवी दिल्ली येथे रविवार, दि. २८ डिसेंबर रोजी कामावर असताना अचानक मृत्यू झाला.मासाळ यांची नियुक्ती सीमा सुरक्षा दलात होती. सध्या ते पंतप्रधान कार्यालय परिसरात सुरक्षारक्षक होते. त्यांचे शालेय शिक्षण जतच्या के. एम. हायस्कूल व रामराव विद्यामंदिरात झाले होते. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर १९९४ मध्ये ते सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. त्यानंतर आसाम, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर व राजस्थान येथे सेवा बजावल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून ते नवी दिल्लीत काम करत होते. दि. २८ डिसेंबर रोजी कामावर असताना अचानक मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ व तीन मुले असा परिवार आहे. ३० डिसेंबर रोजी सोनंद (ता. सांगोला) या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारप्रसंगी शासकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
जतच्या जवानाचा आकस्मिक मृत्यू
By admin | Updated: January 2, 2015 00:11 IST