शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

भांडवली मूल्यावरील घरपट्टीचा प्रस्ताव फेटाळला

By admin | Updated: February 24, 2016 00:41 IST

स्थायी समितीची आढावा बैठक : महापालिकेचे उत्पन्न घटण्याचा धोका

सांगली : फरकासहीत भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी वसूल करण्याचा महापालिका प्रशासनाचा अंदाजपत्रकीय प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या आढावा बैठकीत फेटाळण्यात आला. शासनाचा रेडिरेकनरचा दर जोपर्यंत वाढत नाही, तोपर्यंत भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी न स्वीकारण्याचा निर्णय स्थायी सदस्यांनी यावेळी घेतला. सभापती संतोष पाटील यांनी ही आढावा बैठक बोलावली होती. गत स्थायी सभेत प्रशासनाच्यावतीने अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. त्यातील शिफारसी आणि उत्पन्नवाढीच्या दृष्टीने काही उपाय सुचविण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सदस्यांनी भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीचा मुद्दा उपस्थित केला. महाआघाडीच्या कालावधितच घरपट्टी अधिक लागू करण्यात आल्याचा आरोप सत्ताधारी सदस्यांनी केला. भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केल्यास महापालिकेचे उत्पन्न ३३ टक्क्यांनी घटण्याची शक्यता सदस्यांनी वर्तविली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबतची तुलनात्मक आकडेवारी घेतल्यानंतर सभापती पाटील यांनीही ही गोष्ट मान्य केली. मुंबई महापालिकेनेही भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी नाकारली आहे. त्याचपद्धतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने भांडवली घरपट्टी नाकारावी, अशी मागणी काही सदस्यांनी केल्यानंतर सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. २०१६-१७ या आर्थिक वर्षात घरपट्टी विभागाने थकबाकी व चालू मागणी यांची गोळाबेरीज करून ५३ कोटी रुपये उत्पन्न गृहित धरले होते. भांडवली मूल्यावरील घरपट्टी फरकासहीत आकारण्यात आली, तर उत्पन्नात आणखी वाढ होऊ शकते, असे मत आयुक्तांनी अंदाजपत्रकाच्या प्रस्तावनेत मांडले आहे. उत्पन्न वाढण्याऐवजी कमीच होणार असून, नागरिकांची बिलेही कमी करावी लागतील, अशी भीती सदस्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आहे तशीच घरपट्टीची जुनी पद्धत पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)अनधिकृत बांधकामे वाढली का?नगररचना विभागाचा २०१४-१५ चा महसूल ६ कोटी ७४ लाख रुपये होता. त्यामध्ये ३ कोटी हार्डशीपमधून व अन्य ३ कोटी ७४ लाख परवाने, दंडातून जमा झाले होते. २०१५-१६ या आर्थिक वर्षात या विभागाचा महसूल ५ कोटी २१ लाख इतका कमी झाला. वर्षभरात बांधकामांची संख्या वाढली असताना उत्पन्नात घट झाल्याने सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. एक तर नगररचना विभागाने परवाने प्रलंबित ठेवले असावेत किंवा अनधिकृत बांधकामांची संख्या वाढली असावी, अशी शंका व्यक्त केली. त्यामुळे नगररचनाच्या कार्यक्षमतेचा मुद्दा आगामी सभेत चर्चेत येणार आहे.