आष्टा : येथील बापूसाहेब शिंदे सहकारी पतसंस्थेतर्फे संस्थेचे सभासद आनंदराव माळी, गणेश माळी याना ऊस तोडणी यंत्र संस्थेचे मार्गदर्शक राजारामबापू कारखान्याचे संचालक वीराज शिंदे, अध्यक्ष राजाराम जाकलेकर याच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
वीराज शिंदे म्हणाले, ''बापूसाहेब शिंदे पतसंस्थेने सभासदांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे लहान-मोठे उद्योग भरभराटीला आले आहेत.
यावेळी उपाध्यक्ष अमित कदम, संचालक बाबासाहेब नायकवडी, पंडित माळी, जगन्नाथ बसुगडे, शंकरराव शिंदे, साेसायटीचे अध्यक्ष राहुल पाटील, राजेद्र सांवत, बाबूराव खोत, अशोक माळी, सुनील माळी, पंडित माळी, अमोल माळी, शंकर औताडे, संस्थेचे सचिव नियाजूलहक् नायकवडी आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : ऊस तोडणी मशीनचे पूजन करताना राजारामबापू कारखाना संचालक वीराज शिंदे, अध्यक्ष राजाराम जाकलेकर, गणेश माळी, आनंदराव माळी, अमित कदम, नियाजुलहक नायकवाडी आदी उपस्थित होते.