शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बांधकाम परवाने होणार रद्द

By admin | Updated: April 12, 2017 23:48 IST

चौकशी समिती गठित; उपायुक्तांना १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश

सांगली : महापालिकेच्या बोगस बांधकाम परवान्याचा विषय गंभीर असून, सध्या आठ बोगस परवाने समोर आले आहेत. अजून किती लोकांना परवाने देण्यात आले आहेत, याची चौकशी करण्यासाठी उपायुक्त सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. बोगस बांधकाम परवाने रद्द करून संबंधितांना नोटीसही बजाविली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेचे शिक्के व बोगस सह्या करून बांधकाम परवाने देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नऊजणांविरुद्ध महापालिकेने पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी एका एजंटासह सातजणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे; पण महापालिकेच्या नगररचना विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत ागरिक व सामाजिक संघटनांत साशंकता निर्माण झाली आहे. त्याची गंभीर दखल आयुक्त खेबुडकर यांनी घेतली.ते म्हणाले की, बोगस बांधकाम परवान्याप्रकरणी आम्ही पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. मूळ मालकांवर गुन्हे दाखल केल्याने त्यांच्याकडून या प्रकरणात कोणकोण सहभागी आहेत, याची माहिती समोर येऊ लागली आहे. याबाबत जिल्हा पोलिसप्रमुख, शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांशी चर्चा केली आहे. सध्या तरी महापालिकेचे कर्मचारी, अधिकाऱ्यांची नावे समोर आलेली नाहीत. पोलिसांच्या तपासात एजंटांची नावे उघड झाली आहेत. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होईलच. पोलिस यंत्रणेकडून चौकशीचे काम सुरू आहे; पण महापालिकेकडूनही नगररचना विभागाच्या झाडाझडतीची गरज आहे. त्यानुसार सांगली, मिरज व कुपवाड या तीन कार्यालयांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत. हा विषय गंभीर असल्याने उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली चौकशी समितीही नियुक्त करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत या समितीला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. बोगस बांधकाम परवान्याची आठ प्रकरणे समोर आली आहेत. अजून किती लोकांना अशाप्रकारे बांधकाम परवाने देण्यात आले, याची चौकशी समितीकडून होईल. यात जो दोषी आढळेल त्याची गय केली जाणार नाही. महापालिकेचा पगार घेऊन त्याची बदनामी करायची, हा प्रकार कदापिही खपवून घेणार नाही. बोगस बांधकाम परवान्यामुळे महापालिकेचाही महसूल बुडाला आहे. पदभार नसलेल्यांच्या सह्यांनी परवाने देण्यात आले आहेत. नगररचना विभागात फायली गहाळ होण्याचे प्रमाणही अधिक आहे. विशेषत: मिरज कार्यालयात असे प्रकार अधिक होतात. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तसेच बोसग परवानेही रद्द केले जातील. त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येईल, असेही खेबुडकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)