शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जादा दराने शिलाई यंत्रे खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 01:19 IST

रणधीर नाईक : प्रशासनाला जादा दर सोडून दर्जा तपासण्याची घाई

सांगली : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागातर्फे खरेदी करण्यात आलेल्या शिलाई यंत्रांच्या खरेदी प्रक्रियेत शासनाने ठरवून दिलेल्या दरकरार पत्रकाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. उलट दरकरार पत्रकापेक्षा जादा दराने शिलाई यंत्रे खरेदी करण्यात आली आहेत. याबाबत सध्या चौकशी सुरु असली तरी, दराच्या फरकाबाबत समितीने शहानिशा करणे अपेक्षित असताना, समितीने दरातील फरक सोडून शिलाई यंत्राचा दर्जा तपासण्याचा निष्कारण प्रयत्न चालविल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी गुरुवारी केला. दरम्यान, सायकलींची खरेदीही दरकरारापेक्षा जादा दराने करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नाईक यांनी सांगितले की, महिला व बालकल्याण समितीच्यावतीने करण्यात आलेल्या शिलाई यंत्रे खरेदीत प्रत्येक यंत्रामागे जादा दोन हजार रुपये मोजल्याची तक्रार करण्यात आली होती. याची चौकशी सुरु असली तरी, या यंत्रांची खरेदी करत असताना शासनाने ठरवून दिलेल्या दरकरार पत्रकाचा विचार करण्यात आला नसल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या नियमावलीनुसार शिलाई यंत्रांचा सर्व सेट हा आयएसआय मानांकनाचा असावा. जिल्हा परिषदेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेत मात्र यंत्रे वगळता इतर अ‍ॅक्सेसरीज या आयएसआय मानांकनाच्या असण्याबाबत उल्लेख नाही. शासनाच्या ३० जूनच्या दरकरारानुसार आयएसआय मानांकित सर्व सेटसह शिलाई यंत्राची किंमत ३४९१ रुपये निर्धारित करण्यात आली असतानाही, जादा दराने खरेदी करण्यात आली आहे. खरेदी प्रक्रियेतील संबंधितांना शासनाच्या दरकराराचा संदर्भ घेण्याची आवश्यकता वाटली नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या एक महिन्यापासून हे प्रकरण गाजत आहे. पेपरफुटीनंतर जिल्हा परिषदेची शिलाई यंत्रे व सायकल खरेदी प्रकरणात गोलमाल झाल्याचे उघडकीस आल्याने उलटसुलट चर्चा सुरु आहे. (प्रतिनिधी)दराची चौकशी करणे अपेक्षितशिलाई यंत्रांची जादा दराने खरेदी करण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या निधीचा अपव्यय क रण्यात आल्याने, याची चौकशी करण्याची मागणी असताना, नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने जादा दराबाबत चौकशी करणे अपेक्षित होते. मात्र, या समितीने यंत्रांचा दर्जा तपासण्यास सुरुवात केली आहे व यंत्रे तपासणीसाठी पाठविली आहेत. हा मुद्दाच नसताना, कोणतेही कारण नसताना दर्जा तपासला जात आहे. या समितीने जादा दराने खरेदी करण्यात आल्याबाबत चौकशी करायला हवी, असेही त्यांनी सांगितले.