शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत लाच घेणाऱ्या उपनिरीक्षकास अटक

By admin | Updated: February 3, 2016 00:39 IST

जामिनासाठी घेतले पैसे : माजी सभापतींची तक्रार

मिरज : मटकाप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात जामिनासाठी माजी सभापती अनिल आमटवणे यांच्याकडून दोन हजार रुपये लाच स्वीकारताना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सुरेंद्र मोरे याला सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात अटक केली. सोमवारी रात्री बेडग येथे मटका घेताना सुरेश पाटील (रा. बेडग, ता. मिरज) या एजंटास ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात मटका बुकी म्हणून अनिल आमटवणे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरारी दाखविले होते. पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र मोरे याने मंगळवारी सकाळी आमटवणे यांना अटक करून जामिनावर सोडण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. आमटवणे पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर उपनिरीक्षक मोरे याने जामीन देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. याबाबत आमटवणे यांनी तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात सापळा लावला. उपनिरीक्षक मोरे याचे लाचेच्या मागणीचे संभाषण मोबाईलवर रेकॉर्ड करण्यात आले. पाच हजारांऐवजी दोन हजारात जामीन देण्याचा व्यवहार ठरला. त्यानुसार दोन हजार रुपये लाच स्वीकारल्यानंतर मोरे याला ताब्यात घेऊन लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली. लाचप्रकरणी उपनिरीक्षक रंगेहात सापडल्याने पोलीस कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली होती. मोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अनिल आमटवणे यांनी मटक्याशी संबंध नसतानाही राजकीय अस्तित्व नष्ट करण्यासाठी मिरजेच्या आमदारांच्या दबावाखाली पोलिसांनी दोन वेळा मटकाबुकी असल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याची तक्रार केली. (वार्ताहर)