जत : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबाबत युवासेनेच्या वतीने जत येथील गांधी चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध करण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम चांगले आहे. ते संपूर्ण राज्यातील जनतेच्या विश्वासाला पात्र मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांचे काम काहींच्या डोळ्यात खुपत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी संपादन करण्याच्या नादात नारायण राणे हे माथेफिरूसारखे वक्तव्य करत फिरत आहेत. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय सावंत, तालुका संघटक अमित दुधाळ, विजयराजे चव्हाण, युवा सेना तालुकाप्रमुख (पश्चिम) सचिन मदने, शहरप्रमुख ज्ञानेश्वर धुमाळ, सरचिटणीस रोहित पाचंगे, दिनकर पतंगे उपस्थित होते.
240821\1730-img-20210824-wa0046.jpg
जत येथे राणे यांच्या प्रतिमेचे दहन