शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

मिरजेत दुसऱ्या दिवशीही घरफोडी

By admin | Updated: December 14, 2014 00:40 IST

दीड लाखाचा ऐवज लंपास : चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

मिरज : मिरजेत यशवंत कॉलनीत चोरट्यांनी बंगला फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास केला. श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. मिरजेत सलग दुसऱ्या दिवशी घरफोडी करून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. कोकणे गल्लीत यशवंत कॉलनीत सुधीर दत्तात्रय गलांडे यांचा बंगला आहे. सीसीटीव्ही साहित्याची विक्री करणारे सुधीर गलांडे कामानिमित्त गोव्याला गेले होते. त्यांच्या पत्नी नातेवाइकांकडे गेल्याने बंगल्याला कुलूप होते. अज्ञात चोरट्याने शुक्रवारी रात्री बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील चार तोळे सोन्याचे मंगळसूत्र, पाटल्या, नेकलेस, बिलवर, देवघरातील चांदीची भांडी, मूर्ती, ताट, वाटी, १७ हजार रोख रक्कम असा दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. वरच्या मजल्यावर राहणारे गलांडे यांचे बंधू हेमंत गलांडे यांना आज सकाळी सुधीर यांच्या घराचे कुलूप तोडल्याचे दिसले. त्यांना चोरी झाल्याचे दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. चोरट्याने चोरी करून जाताना बंगल्याच्या आवारात प्रात:र्विधी केला होता. चोरट्याचा माग काढण्यासाठी श्वानपथक आणण्यात आले. श्वानपथक बंगल्याच्या पिछाडीस ओढ्याच्या बाजूने बोलवाड रस्त्यापर्यंत जाऊन घुटमळले. चोरटा तेथून वाहनाने पसार झाल्याचा अंदाज आहे. घरफोडीबाबत हेमंत गलांडे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.