शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

लांडगेवाडीत घरफोडी

By admin | Updated: June 17, 2014 00:44 IST

११ तोळे सोने लंपास

शिरढोण (जि. सांगली) : लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे काल, रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी घर फोडून चार लाख रुपयांचे अकरा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. हा चोरीचा प्रकार आज, सोमवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत सुशीला विठ्ठल कदम यांनी फिर्याद दिली आहे. चोरीमुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. सुशीला कदम यांचे गावालगत घर आहे. त्या काल जाधववाडी येथे माहेरी गेल्या होत्या. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या दरम्यान कदम यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा एक्सा करवतीने कापून आत प्रवेश केला. तत्पूर्वी चोरट्यांनी कदम यांनी भाड्याने दिलेल्या खोल्यांना बाहेरून कडी लावली होती. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट कटावणीने उचकटून त्यातील स्टीलच्या डब्यामधील पाच तोळ्यांच्या पाटल्या, पावणेतीन तोळ्यांचा लक्ष्मीहार, सव्वातीन तोळ्यांची मोहनमाळ असे सुमारे चार लाख रुपयांचे अकरा तोळे सोने लंपास केले. चोरट्यांनी घरातील भांडी, डबे, कपडे तसेच इतर साहित्य इतरत्र विस्कटले होते. सुशीला कदम सकाळी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. शिरढोण येथील बॅँकेत ठेवलेले दागिने त्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच घरी आणले होते. उकाड्यामुळे पंखे सुरू असल्याने त्याच्या आवाजामुळे भाडेकरूंना चोरीचा प्रकार समजला नाही. सकाळी दार उघडत नसल्याने त्यांनी गावातील नातलगांना दूरध्वनी करून कडी काढण्यास बोलावले. दरम्यान, सांगलीहून मागवलेल्या श्वानाने घरापासून दक्षिण बाजूस दीड किलोमीटरपर्यंत माग काढला. तेथे राजाराम कदम यांच्या शेतामध्ये श्वान घुटमळले. या शेताला लागून ओढा आहे. या ओढ्यामधून चोरटे वाहनाने गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलीस निरीक्षक युवराज मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक जे. जे. पवार, पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरू, आदींनी घराची पाहणी केली. (वार्ताहर)