शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात गुंडगिरी फोफावतेय

By admin | Updated: March 15, 2016 00:13 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : गल्लीबोळातून गुन्हेगारीचा आलेख वाढतोय

अशोक पाटील-- इस्लामपूर शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढतंच चालला आहे. गेल्या काही वर्षात पोलीस ठाण्यात सर्वसामान्यांना न्याय देण्यापेक्षा तडजोडीचेच पेव फुटले आहे. तसेच राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली वावरत असलेल्या गल्लीबोळात फाळकूट दादांची संख्या वाढू लागली आहे. त्यांना लगाम घालण्यात पोलीस अधिकारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुका पार पडेपर्यंत काही अतिसंवेदनशील चौकात टोळीयुध्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शहरात राजरोसपणे मटका सुरु आहे. हा व्यवसाय राजकीय लोकांच्या वरदहस्ताखाली सुरु असून या व्यवसायात मोठी स्पर्धा सुरु आहे. लागलेल्या आकड्याचे पैसे जो लगेच देईल, त्याच बुकीकडे ग्राहकांचा लोंढा वाढला आहे. शहरातील बहुतांश टपऱ्यांमधून खुलेआम मटका सुरु आहे. पालिका प्रशासन त्यांच्याकडून कायदेशीररीत्या जागेची कर वसुली करुन या व्यवसायाला अभयच देत आहे. गेल्या काही महिन्यात शहरात ४ खून झाले आहेत, तर काही गावगुंडांनी हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. खंडणी, सावकारी या व्यवसायाला तर उधाण आले आहे. यातूनच होणाऱ्या पैशाच्या जुळवाजुळवीवर नगरपालिकेची आगामी निवडणूक अवलंबून असल्याची चर्चा गावगुंडांकडून होत आहे.आगामी पालिका निवडणुकीत छोटे प्रभाग असणार आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यातच राष्ट्रवादीत ३ गट सक्रिय आहेत. या गटनेत्यांच्या ताकदीवरच गल्लीबोळातून नवीन उमेदवार निर्माण होऊ लागले आहेत. या गटनेत्यांनी आपणास उमेदवारी दिली नाही, तर बंडखोरी करण्याच्या तयारीतही काहीजण आहेत. त्यामुळे पक्षांतर्गतच मोठा संघर्ष पाहावयास मिळणार, अशी चिन्हे आहेत.राष्ट्रवादीच्या विरोधात महाडिक युवा शक्ती, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन निवडणूक लढवत आले असले तरी, सत्ताधारी ही निवडणूक आर्थिक ताकदीवर एकतर्फी जिंकत आले आहेत. आगामी निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीतच बंडखोरी उफाळणार आहे. शहरात सध्या महाडिक युवाशक्ती, एन.ए., ए.पी. ग्रूप सक्रिय आहेत. त्यांनी आतापासूनच पालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे लाल चौक, शिराळा नाका परिसर, शिवनगर, शिवाजी चौक, जावडेकर चौक संवेदनशील बनत चालले आहेत. ऐन निवडणुकीत याठिकाणी टोळीयुध्द भडकण्याची शक्यता आहे.खमक्या अधिकारी हवाआघाडी शासनाच्या काळात जयंत पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी पोलीस खात्यात अमूलाग्र बदल करू, अत्याधुनिक शस्त्रे देऊ, अशी घोषणा केली होती. परंतु त्यांच्याच इस्लामपूर शहरातील पोलीस ठाण्यात गेल्या १५ वर्षाहून अधिक काळ लोटला तरी, खमक्या पोलीस अधिकारी मिळाला नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे.गेल्या १0 वर्षात शहर व परिसरात वावरणाऱ्या गुंडांची माहिती घेतली जाणार आहे. त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, याची शहानिशा करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शहरात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी सामाजिक संघटनांची मदत घेतली जाईल. ज्यांना गुंडगिरीचा त्रास होत आहे, त्यांनी न घाबरता माझ्याशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.- प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक, इस्लामपूर.