शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शामरावनगरमधील इमारती दरवर्षी खचत जातील; जागतिक बँकेच्या प्रतिनिधींकडून चिंता

By अविनाश कोळी | Updated: June 26, 2024 20:21 IST

उपाययोजनांबाबत उपस्थित केले प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पावसाळी पाण्याचा निचरा केला गेला नाही तर, शामरावनगर येथील इमारती दरवर्षी दोन मिलीमीटरने खचत जातील, अशी भीती जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी बुधवारी व्यक्त केली. गेल्या वीस वर्षात येथील पाणी निचऱ्यावर महापालिकेने कोणतीही उपाययोजना का केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महापूर नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने जागतिक बँकेकडे ४७६ कोटींच्या निधीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याअनुषंगाने जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी बुधवारी सांगलीत पूरग्रस्त भागासह सांडपाणी साचून राहणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत बुधवारी स्थायी समिती सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीस जागतिक बँकेचे वरिष्ठ आपत्ती जोखीम व्यवस्थापन विशेषज्ञ अनुप कारंथ, वरिष्ठ वित्तीय व्यवस्थापन विशेषज्ञ विनय ग्रोव्हर, वरिष्ठ सामाजिक विकास विशेषज्ञ वरुण सिंग, वरिष्ठ पर्यावरण तज्ज्ञ श्रीमती नेहा व्यास उपस्थित होते.

महापालिका क्षेत्रातील पूरबाधित क्षेत्र आणि पावसाळ्यात पाणी निचरा न होणारे रस्ते, चाैक तसेच शामरावनगरचा परिसर याठिकाणी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने जागतिक बँकेला प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या सल्लागार संस्थेने पावसाळी पाणी निचरा व्यवस्थापनाविषयी सादरीकरण केले.

प्रस्तावाच्या अनुषंगाने बँकेच्या पथकाने सांगलीतील महापूर बाधित अनेक ठिकाणांची पाहणी केली. त्यांनी शामरावनगर, के. टी. बंधारा, आयर्विन पूल, कुंभार मळा, कृष्णा नदीकाठ, मारुती चौक आदी ठिकाणच्या पाणी साचून राहण्याच्या समस्येची माहिती घेतली.यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, चंद्रकांत खोसे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे, डॉ. रवींद्र ताटे, सहायक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, अभियंता महेश मदने उपस्थित होते.