शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट, स्टील दरवाढीविरोधात बांधकाम व्यावसायिक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:25 IST

सांगली : सिमेंट आणि स्टीलच्या दरवाढीविरोधात बांधकाम व्यावसायिकांनी दंड थोपटले आहेत. शुक्रवारी देशव्यापी काम बंद आंदोलन केले. दोन महिन्यांत ...

सांगली : सिमेंट आणि स्टीलच्या दरवाढीविरोधात बांधकाम व्यावसायिकांनी दंड थोपटले आहेत. शुक्रवारी देशव्यापी काम बंद आंदोलन केले. दोन महिन्यांत ४० टक्के दरवाढीमुळे कंबरडे मोडल्याची तक्रार बांधकाम व्यावसायिकांनी केली.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या बंदला क्रेडाई, हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, इंजिनिअर्स ॲण्ड आर्किटेक्ट्स असोसिएशन, सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन आदींनी पाठिंबा दिला. त्यामुळे जिल्ह्यात शेकडो बांधकामे ठप्प झाली. बिल्डर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील कौलगुड, सचिव अमित पेंडुरकर, क्रेडाईचे अध्यक्ष रवींद्र खिलारे, रोड बिल्डर्स असोसिएशनचे बाबा गुंजाटे यांनी भूमिका विशद केली. ते म्हणाले, कोरोना ओसरताच स्टील व सिमेंटची दरवाढ सुरू झाली. दोन महिन्यांत सिमेंट गोणीमागे १०० ते १४० रुपयांनी महागले. सळई टनामागे १५ ते २० हजारांनी भडकली. बांधकामात त्यांचा वापर ६५ टक्के आहे, त्यामुळे दरवाढीचा थेट फटका बसला. कौलगुड म्हणाले की, परवडणाऱ्या घरांची घोषणा सरकार करो; पण स्टील व सिमेंटच्या दरवाढीने घरांच्या किमती भडकणार आहेत. खिलारे म्हणाले, कंपन्यांनी एकजूट केली असून नफेखोरीतून मिळणारा पैसा राजकारणासाठी वापरला जात असावा.

कृत्रिम दरवाढीविरोधात संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना निवेदन दिले. यावेळी अनंत खैरमोडे, स्वप्नील कुंभारकर, एस. एफ. चौगुले, अनिल बाफना, एस. बी. पाटील, दिलीप पाटील, सुनील कोकीतकर आदी उपस्थित होेते.

चौकट

नियामक प्राधिकरणाची मागणी

कौलगुड म्हणाले, सिमेंट व स्टीलचा कच्चा माल देशातच उत्पादित होत असतानाही भरमसाट दरवाढ सुरू आहे. याच्या निषेधार्थ भविष्यात आणखी तीव्र आंदोलनाचीही तयारी आहे. सिमेंटवर सर्वाधिक म्हणजे २८ टक्के जीएसटी आकारला जातो. दर वाढतील त्यानुसार जीएसटी संकलनही वाढते, त्यामुळे सरकार कानाडोळा करत असावे. दरवाढीवर नियंत्रणासाठी राष्ट्रीय सिमेंट व स्टील नियामक प्राधिकरण स्थापन करावे, अशी आमची मागणी आहे.

--------