मिरज - सलगरे या रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा अनिल आमटवणे यांनी दिला.
बेडग- लिंगनूर. रस्ता पॅचवर्क कामाच्या निधीतही संगनमताने घोटाळा सुरू असल्याचाही त्यांनी आरोप केला. विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, रंगराव जाधव, किरण बंडगर, सतीश कोरे यांनी भागातील रस्त्यांचे प्रश्न उपस्थित केले. क्वालिटी कंट्रोलचा रस्ता कामाचा अहवाल बोगस असल्याचा आरोप कृष्णदेव कांबळे यांनी केला.
चौकट
अवैध धंद्याविरोधात सभेत ठराव
मिरज पूर्व भागात सुरू असलेल्या अवैध धंदे बंद करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनिल आमटवणे यांनी तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी अनिल आमटवणे व किरण बंडगर यांनी केली. सभेत तसा ठरावही झाला.
चौकट
कारवाई करा !
तालुक्यात मागासवर्गीयांच्या शौचालय सुशोभीकरण कामातील घोटाळ्याप्रकरणी यंत्रणा अद्याप चौकशीतच व्यस्त आहे. या घोटाळ्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी न घालता जि.प. प्रशासनाने कारवाई करावी, अन्यथा आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा किरण बंडगर व कृष्णदेव कांबळे यांनी दिला.