शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महापालिकेचे बजेट ६०३ कोटींवर

By admin | Updated: April 1, 2016 01:24 IST

महासभेकडे सादर : ‘स्थायी’कडून १७ कोटींची वाढ

सांगली : नागरिकांवर कराचा बोजा न टाकता शहराचे रूप बदलण्याचे स्वप्न दाखवीत गुरुवारी स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी महापालिकेचे २०१६-१७ चे अंदाजपत्रक महासभेकडे सादर केले. आयुक्तांच्या अंदाजपत्रकात १७ कोटींची वाढ केल्याने पालिकेचे अंदाजपत्रक ६०३ कोटी २३ लाखांवर गेले आहे. उत्पन्नवाढीच्या दृष्टीने सभापतींनी अनेक उपाययोजना अंदाजपत्रकात सुचविल्या आहेत. पालिकेच्या नगरसेवकांना या अंदाजपत्रकाचा अभ्यास करून सूचना करण्यासाठी गुरुवारची महासभा तहकूब करण्यात आली. आता ११ एप्रिलला अंदाजपत्रकावर चर्चा होणार असल्याचे महापौर हारुण शिकलगार यांनी जाहीर केले. पालिका आयुक्त अजीज कारचे यांनी ८५८ कोटी ८५ लाख रुपये जमेचे व ३६ लाख ३८ हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते. या अंदाजपत्रकावर स्थायी समितीच्या सदस्यांनी सूचना करून आज अंदाजपत्रक महासभेकडे सादर करण्यात आले. स्थायी समितीने जमेच्या बाजूला ९ कोटी ५९ लाख रुपयांची वाढ केली आहे. यात घरपट्टीतून अडीच कोटी, बांधकाम दंडात्मक शुल्कातून एक कोटी, पाणीपट्टीतून चार कोटी, चर दुरुस्तीतून एक कोटीच्या उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे. खर्चाच्या बाजूला ३४ कोटी ९१ लाख रुपयांची वाढ करतानाच आयुक्तांच्या अंदाजपत्रकातील १७ कोटी ७६ लाख रुपयांच्या तरतुदीला कात्री लावली आहे. या प्रामुख्याने ड्रेनेज चर दुरुस्तीचे सव्वा कोटी, मिरज सभागृह, आयुक्त निवासस्थान, वारकरी भवन, नवीन गटारी व नाले, औद्योगिक वसाहतीतील रस्ते, वॉर्ड विकास निधी, सरकारी घाटाचे सुशोभीकरण यांचा समावेश आहे. अंदाजपत्रकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी दहा लाखांची तरतूद केली आहे. शहरात अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामे सुरू आहेत. त्याचा सर्व्हे करण्यासाठी पालिकेकडे मनुष्यबळ नाही. खासगी एजन्सी नियुक्त करून बेकायदा बांधकामाचा सर्व्हे करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय आरोग्य विमा, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, सांगली व कूपवाडला गॅस दाहिनी, समाजमंदिरे, उद्यान, गटारी यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)