शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे बजेट सहाशे कोटींवर

By admin | Updated: March 1, 2017 23:53 IST

करवाढ फेटाळणार : स्थायी समितीकडून वाढ अपेक्षित

सांगली : महापालिकेच्या २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात स्थायी समितीच्यावतीने तब्बल २२ कोटींच्या उत्पन्नवाढीची शिफारस केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेचे अंदाजपत्रक सहाशे कोटींपेक्षा अधिक होणार आहे. प्रशासनाने प्रस्तावित केलेली घरपट्टी, पाणीपट्टीतील वाढ मात्र फेटाळण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत करवाढ न करण्याचा पवित्रा स्थायी सदस्यांनी घेतला आहे. महापालिका प्रशासनाने यंदाचे ५७९.३९ कोटींचे व १६ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. या अंदाजपत्रकात स्थायी सदस्यांच्या सूचनांचा समावेश करण्यासाठी बुधवारी सभापती संगीता हारगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. स्थायी सदस्यांच्या सूचनेसह लवकरच अंदाजपत्रक महासभेकडे सादर केले जाणार आहे. बुधवारी पालिकेच्या जमा बाजूवर चर्चा करण्यात आली. यावेळी नगरसेवक संतोष पाटील, दिलीप पाटील, राजू गवळी, संजय बजाज, बसवेश्वर सातपुते, मनगू सरगर, अलका पवार, प्रार्थना मदभावीकर, प्रियांका बंडगर, शहर अभियंता विजय कांडगावे, आर. पी. जाधव, सुनील आंबोळे आदी अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न २७० कोटी ८७ लाख रुपये धरले आहे. त्यात आणखी २२ कोटींची भर स्थायी समिती सदस्यांनी सुचविली आहे. यामध्ये घरपट्टीतून सुमारे साडेपाच कोटींची वाढ अपेक्षित आहे. गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. नियमितीकरणाचे प्रस्ताव मार्गी लावल्यास त्यातून सात ते आठ कोटीचे उत्पन्न मिळू शकते. शिवाय त्याच्यावर घरपट्टी लागू करून उत्पन्नवाढ होऊ शकते. पाणीपट्टी तसेच नवीन नळ कनेक्शनद्वारे साडेसात कोटींची वाढ सुचविण्यात आली. मालमत्ता करातून थकित दीड कोटींवर उत्पन्न वसूल झालेच पाहिजे, असे आदेश सभापती संगीता हारगे यांनी दिले. प्रसंगी थकित भाडे न भरणाऱ्यांचे गाळे ताब्यात घेऊन लिलाव काढा, अशा सूचना त्यांनी दिल्या. एलबीटीच्या थकबाकीतूनही सात ते आठ कोटींची उत्पन्नवाढ सुचविण्यात आली. पालिका क्षेत्रात १ लाख २३ हजार मालमत्ता आहेत, मात्र पाणी कनेक्शन्स ७३ हजार आहेत. पालिकेचे कर्मचारी घरपट्टीची बिले वाटप करताना पाणी कनेक्शनचाही सर्व्हे करणार आहेत. त्यातून २५-३० हजार नवीन पाणी कनेक्शन्स वाढणार आहेत, शिवाय बोगस कनेक्शन्सची माहितीही मिळेल. (प्रतिनिधी)