शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

६४३ कोटींचे अंदाजपत्रक

By admin | Updated: March 24, 2017 23:29 IST

सभापतींकडून महासभेकडे सादर; प्रशासनाची करवाढ फेटाळली

सांगली : महापालिकेच्या अपूर्ण योजनांच्या पूर्ततेचा संकल्प करीत स्थायी समिती सभापती संगीता हारगे यांनी २०१७-१८ चे ६४३ कोटी ३३ लाख रुपयांचे व १३ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक शुक्रवारी महासभेकडे सादर केले. पुढीलवर्षी होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रभागातील कामांची बायनेम तरतूद करीत नगरसेवकांना निवडणुकीची भेट दिली. घरपट्टी, पाणीपट्टी वाढीची प्रशासनाने केलेली शिफारस स्थायी समितीने फेटाळून लावली आहे. उत्पन्नवाढीसाठी कठोर पावले उचलण्याची शिफारसही सभापतींनी केली आहे. दरम्यान, नगरसेवक शेखर माने, गौतम पवार, संजय बजाज, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, गटनेते किशोर जामदार यांनी, नगरसेवकांना या अंदाजपत्रकाचा अभ्यास करून सूचना करण्यासाठी महासभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यानुसार महापौर हारूण शिकलगार यांनी अंदाजपत्रकीय सभा तहकूब करीत, ३० मार्चला अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात येईल, असे जाहीर केले. महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी ५७९ कोटी ३९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक गत महिन्यात स्थायी समितीकडे सादर केले होते. या अंदाजपत्रकात स्थायी समितीने ६३ कोटी ८० लाख रुपयांची वाढ करीत ६४३ कोटींचे अंदाजपत्रक महापौर शिकलगार यांच्याकडे सादर केले. महापालिकेच्या महसुली उत्पन्नात वाढ करण्याच्यादृष्टीने एलबीटी, मालमत्ता कर, विविध फीपासून मिळणारे उत्पन्न, बांधकाम शुल्क, पाणीपट्टी बिले यांची थकबाकी वसुली केल्यास ६३ कोटी रुपयांची उत्पन्नवाढ होऊ शकते. त्यासाठी प्रशासनाने वसुलीवर भर देण्याची गरज आहे. महापालिका हद्दीत अनेक नवीन बांधकामे सुरू आहेत. त्यांचा सर्व्हे करून घरपट्टीची आकारणी केल्यास या करातही मोठी वाढ होईल. शिवाय तत्कालीन सांगली, मिरज नगरपालिकेच्या काळात स्वमालकीच्या इमारतींमधील गाळे नाममात्र भाड्याने दिले आहेत. त्यांची भाडेवाढही करण्यात आलेली नाही. काही गाळेधारकांनी पार्टीशन करून परस्परच हे पोटभाडेकरू ठेवले आहेत. त्यामुळे मालमत्ता विभागाने विनाविलंब याचा सर्व्हे हाती घ्यावा, अशी शिफारसही सभापतींनी अंदाजपत्रकात केली आहे. पुढीलवर्षी महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीपूर्वी नगरसेवकांना त्यांच्या प्रभाग विकासासाठी सभापतींनी तब्बल ६६ कोटींची तरतूद केली आहे. ही तरतूद करताना नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांची बायनेम तरतूदही केली आहे. रस्ते, गटारी, विद्युत दिवे यांच्यापासून स्मशानभूमीच्या विकासापर्यंत प्रभागातील किरकोळ कामांचाही अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)पहिल्यांदाच महिला सदस्यांकडून अंदाजपत्रक सादरमहापालिका स्थायी समिती सभापती पदाची सूत्रे संगीता हारगे यांच्यारुपाने महिला सदस्याकडे देण्यात आली आहेत. पालिकेच्या इतिहासात प्रथमच एका महिला सदस्याने महासभेकडे अंदाजपत्रक सादर केले. यावेळी सत्ताधारी काँग्रेससह उपमहापौर गट, स्वाभिमानी आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसनेही संगीता हारगे यांचे कौतुक केले.