शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ला फार मोठे समजणाऱ्यांचे फुगे फुटले

By admin | Updated: March 26, 2017 22:33 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : उदयनराजेंवर नाव न घेता केली टीका; कोण कसे वागतो हे जिल्ह्याला माहीत पडले...

सातारा : ‘जिल्ह्यातील काही लोकांना वाटतं आपलं नाव मोठे आहे. असे समजणाऱ्यांचे फुगे फुटले आहेत, कोण कसे वागतो, हे जिल्ह्याला चांगलेच कळाले आहे,’ अशी टीका विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता केली. येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, पंचायत समित्यांमधील राष्ट्रवादीच्या नूतन सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार नरेंद्र पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, अ‍ॅड. राजाभाऊ उंडाळकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुरेश घुले, माजी आमदार प्रभाकर घार्गे, सत्यजित पाटणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.‘राष्ट्रवादीशी गद्दारी करणाऱ्यांची यादी आम्ही पक्षनेत्यांना देतो, हे लोक आम्हाला पक्षात नको आहेत. त्यांना पहिल्यांदा पक्षातून बाजूला करा,’ अशी मागणीही रामराजेंनी यावेळी केली. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘जिल्हा परिषदेची निवडणूक ही छोटी विधानसभेची निवडणूकच असते. पक्षाच्या झेंड्याखाली असतानाही अनेकजण बाहेर पडले. काहींनी आघाडी काढली. राष्ट्रवादीला खिंडीत पकडण्याचे डाव खेळले गेले. रामराजेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी एकत्र आली, देशात कोणाचीही लाट असली, कितीही नोटांचा बाजार झाला असला तरीही घड्याळाचाच गजर जिल्ह्यात झाला. खासदार आमच्याबरोबर नाहीत. आघाडीचे निश्चित नाही. सत्ता गेल्यावर काय शहाणपण शिकावं लागतं हे सर्वांनाच आता कळालेलं आहे. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारले. हे सरकार शेतकऱ्यांनाच दोषी ठरवत आहे. सत्तेच्या मस्तीत धुंद असणाऱ्यांविरोधात आमचा लढा आहे.’ पक्षाची चौकट अधिक कडक करणे जरुरीचे आहे. कार्यकर्त्यांना अधिक ताकद देऊन लोकांना दिलासा मिळवून देण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याचे आवाहनही आमदार शिंदे यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या हॉलचे उद्घाटन दादांच्या हस्ते...दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त जिल्हा परिषदेने बांधलेल्या आॅडिटोरिअम हॉलला ९ कोटी रुपये मिळवून देण्यात अजित पवार यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांच्याच हस्ते आॅडिटोरिअम हॉलचे उद्घाटन केले जाणार असल्याचे रामराजेंनी स्पष्ट केले.आडवं येणाऱ्याला आडवं करू...भाजपचे सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवित आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकरी जागा करण्याचे काम आम्ही करणार आहोत. निवडणूक कधीही लागू द्या, कोणीही आडवं येऊ द्या, त्यांना आम्ही आडवं करू, असे आमदार शशिकांत शिंदे आक्रमकपणे गरजले.विधानपरिषदेचा आमदार मकरंद पाटील देतील तोचसांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला धोक्याला सामोरे जावे लागले होते. हा संदर्भ जोडून आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार मकरंद पाटील सांगतील, त्यालाच आगामी विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले.