शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जमीन वाटणीच्या वादातून भावाला फावड्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST

आनंदा व विठ्ठल चाैगुले या सख्ख्या भावात शेतजमिनीच्या वाटणीचा वाद आहे. शेतात पेरणी करण्यापूर्वी शेतजमिनीची वाटणी ...

आनंदा व विठ्ठल चाैगुले या सख्ख्या भावात शेतजमिनीच्या वाटणीचा वाद आहे. शेतात पेरणी करण्यापूर्वी शेतजमिनीची वाटणी करण्यासाठी दोघांत चर्चा सुरू असताना विठ्ठल याने शेताची मोजणी न करता, मी माझ्या शेतामध्ये पेरणी करणार, असे सांगितले. यावेळी आनंदा यांनी मोजणी झाल्याशिवाय पेरणी करायची नाही, असे म्हटल्याने विठ्ठल याने चिडून फावड्याने मारहाण केल्याची आनंदा चौगुले यांची तक्रार आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.

-------------------

मिरजेत महिलेच्या ५० हजारांच्या बांगड्या लंपास

मिरज : मिरजेत शासकीय रुग्णालयामागे दोन चोरट्यांनी स्मिता सतीश सुपनेकर यांची फसवणूक करून ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन पोबारा केला.

सुपनेकर या सोमवार, दि.३१ मे रोजी रात्री ९.३० वाजता शासकीय रुग्णालयाच्या मागील रस्त्याने भारतनगरकडे जात होत्या. त्या एकट्याच असल्याचे पाहून दुचाकीवरील दोघांनी त्यांना अडविले. दोघांनी त्यांना पुढे दरोडा पडला आहे. तुमच्या बांगड्या सांभाळून ठेवा, असे सांगितले. यामुळे सुपनेकर यांनी हातातील बांगड्या काढल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन पोबारा केला. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरजेत पत्र्याचे शेड चोरीस

मिरज : मिरजेतील एकता कॉलनीतील पत्र्याचे संपूर्ण शेड, विद्युत मीटर चोरट्यांनी लंपास केले. याबाबत जमीर मकबुल सनदी यांनी गांधी चौक पोलिसांत फिर्याद दिली आहे. सनदी यांनी एकता कॉलनी येथे पत्र्याचे शेड बांधून खोली तयार केली होती. दि.१६ मे ते दि.१ जूनदरम्यान अज्ञात चोरट्यांनी १२ हजार रुपये किमतीचे ३५ पत्रे असलेले संपूर्ण शेड व लाइट मीटर चोरून नेल्याचे सनदी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

मिरजेत किरकोळ कारणावरून एकावर चाकूहल्ला

मिरज : मिरज- मालगाव रस्त्यावरील अमननगर बसस्थानकाजवळ मंजूर सुलेमान शेख यांना मलिक मुराद पटवेगार याने चाकूने मारून गंभीर जखमी केले. मंगळवारी सायंकाळी मंजूर शेख हे त्यांच्या फॅब्रिकेशन दुकानाजवळ मित्रांसमवेत बोलत थांबले होते. त्यावेळी मलिक पटवेगार तेथे आला. शेख यांनी पटवेगार यास, तू दारू पिला आहेस, घरी जाऊन झोप, असे म्हटले. पटवेगार याने जास्त शहाणपणा करू नकोस, तू कोण मला बोलणार, असे म्हणत शेख यांच्या मानेवर चाकूने हल्ला केल्याची तक्रार आहे. चाकूहल्ल्यात शेख जखमी झाले असून, मिरज शहर पोलिसांत याबाबत नोंद आहे.