शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या भरतीवर दलालांचा डोळा

By admin | Updated: November 5, 2015 23:55 IST

तरुणांना आमिष : भरतीला अद्याप शासनाची मंजुरी नाही, फसवणुकीची शक्यता

सांगली : नव्या आकृतीबंधानुसार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ५३0 कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. अद्याप या भरतीला मंजुरी मिळाली नसताना, जिल्ह्यातील काही भामट्या दलालांनी आमिष दाखवून तरुणांना लुटण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे या भरतीवरून तरुणांची फसवणूक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेला रिक्त पदांच्या भरतीची गरज वारंवार भासत आहे. एक हजार कर्मचाऱ्यांच्या जोरावर बँकेचा कारभार सुरू आहे. सर्वात जास्त उलाढाल असणाऱ्या या बँकेचा गाडा कमी कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. अनेक नव्या योजना व उलाढाल वाढीच्यादृष्टीने जादा कर्मचाऱ्यांची गरज निर्माण झाली होती. रिक्त पदांचा विचार करता, बँकेला १ हजार ४0४ पदांचा आकृतीबंध अपेक्षित होता. प्रत्यक्षात हा आकृतीबंध आता १ हजार ५३0 पर्यंत गेला आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा चांगला आकृतीबंध तयार झाला. हा प्रस्ताव आता सहायक आयुक्त तसेच नाबार्डकडे पाठविण्यात आला आहे. भरतीसाठी केवळ प्रस्ताव गेल्यानंतर भरती होणार असल्याची अफवा पसरवून जिल्ह्यातील काही दलालांनी गरजू तरुणांवर जाळे टाकले आहे. या जाळ्यात काहीजण अडकण्याची चिन्हे आहेत. जिल्हा बँकेत वशिला असल्याचे भासवून हे जाळे टाकले जात आहे. वास्तविक शासनाच्या यादीतील अधिकृत कंपनीमार्फत पारदर्शीपणाने भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याने वशिल्याचा कोणताही संबंध याठिकाणी येत नाही. तरीही काही गरजू तरुण अशा दलालांच्या अफवांवर विश्वास ठेवून त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करण्यास सरसावले आहेत. बँकेच्या एका संचालकालाही खुद्द या गोष्टीचा अनुभव आला. व्यवहार करण्याच्या तयारीत असलेल्या एका युवकाला वेळीच सावध केल्याने त्याची फसगत टळली. तरीही दलालांची टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे. गरजू तरुणांचा शोध घेऊन त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी दलाल प्रयत्नशील आहेत. जिल्हा बँकेतील रिक्त पदांच्या भरतीची चर्चा गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. प्रशासकांच्या कालावधितही यासाठी शासनस्तरावर प्रयत्न झाले. पण प्रत्यक्षात भरती प्रक्रियेला मंजुरी मिळालीच नाही. आता संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर नाबार्डने नवा आकृतिबंधच जाहीर केल्याने, त्यानुसार पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. गत आठवड्यात हा प्रस्ताव सहकार विभाग व नाबार्डकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला शासन मंजुरीची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)तांत्रिक पदे वाढवण्यात आली नव्याने आकृतीबंधात सॉफ्टवेअर व हार्डवेअर इंजिनिअर्सची प्रत्येकी दोन पदे, तसेच अन्य बऱ्याच तांत्रिक पदांचा समावेश यात झाला आहे. बँकेकडील खेळते भांडवल, शाखानिहाय उलाढाल व खेळते भांडवल यावर पदांचा आकृतिबंध अवलंबून आहे. जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती, उलाढाल चांगली असल्याने आकृतिबंधही तितकाच सक्षम झाला आहे. नव्या पदांच्या भरतीस मंजुरी मिळाल्यानंतर बँकेच्या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मंजुरीला किती कालावधी लागेल, हे अद्याप सांगता येत नाही.दराचाही गवगवा सुरुजिल्हा बँकेतील एका पदाच्या भरतीसाठी ९ ते १0 लाख रुपये द्यावे लागतील, असे काही दलाल सांगत आहेत. मोठ्या पदांच्या भरतीसाठी १४ ते १५ लाख रुपये दर दलालांनीच काढला आहे. म्हणजेच तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा डाव आखला जात आहे.