शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशांची दलाली करणाऱ्यांना सत्तेवरून हटवू

By admin | Updated: February 19, 2016 00:16 IST

मोहन प्रकाश : सांगलीत कॉँग्रेसचा राज्यव्यापी एल्गार मेळावा; शेतकरी, जनतेवर शासनाकडून अन्याय

सांगली : पारतंत्र्यात ज्यांनी ब्रिटिशांची दलाली केली, त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार देशात आणि महाराष्ट्रात आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या या इंग्रजांच्या दलालांना सत्तेवरून हाकलून लावू, असा इशारा कॉँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी सांगलीत दिला. येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर कॉँग्रेसचा ‘एल्गार मेळावा’ पार पडला. यावेळी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. पतंगराव कदम, आ. सतेज पाटील उपस्थित होते. मोहन प्रकाश पुढे म्हणाले की, ब्रिटिशांच्या राजवटीतही स्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्यांबरोबर हे लोक नव्हते. त्यांनी त्यावेळी ब्रिटिशांची दलाली केली. आता सत्तेत हेच लोक आल्याने त्यांना जनतेच्या सुख-दु:खाशी देणे-घेणे नाही. ब्रिटिशांना हाकलून लावणाऱ्या कॉँग्रेसलाही आता पाहायचे आहे की, ब्रिटिशांच्या दलालांमध्ये किती दम आहे. आम्ही त्यांना ब्रिटिशांप्रमाणे सत्तेवरून हटवू. दलित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कमी करून अमिताभ बच्चन आणि हेमामालीनीच्या नृत्यावर हे सरकार पैसे उधळत आहे. या सरकारला देशातील प्रश्नांचे भान राहिलेले नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होऊनही सरकार शांत आहे. असे सरकार फार काळ देशात आणि राज्यांमध्ये राहणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. अशोक चव्हाण म्हणाले की, हे सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांची खाती नाहीत म्हणून त्यांना मदत देण्यास नकार देण्याची भूमिका सरकारने स्वीकारली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर टिंगलटवाळीसुद्धा केली जात आहे. अशा कृतीतून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा उद्योग फडणवीस सरकार करीत आहे. राज्यातील चारा छावण्या बंद केल्या, तर राज्यभर आम्ही तीव्र आंदोलन करू. मोजक्या उद्योजकांनाच सांभाळण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे. आदिवासी आणि दलितांच्या जमिनीही गिळंकृत करून त्या उद्योजकांच्या घशात घातल्या जात आहेत. सरकारला कारभार करण्यासाठी दिलेली ‘डेडलाईन’ आता संपलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून शहरी भागावरच लक्ष केंद्रीत करण्याचे काम भाजप करीत आहे. आम्हाला दुष्काळाचे राजकारण करायचे नाही, पण शेतकरी आणि सर्वसामान्य जनता अडचणीत येत असेल, तर आम्ही विरोधक म्हणून सरकारला जाब विचारू. यावेळी आ. सतेज पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, महापौर हारुण शिकलगार यांची भाषणे केली. यावेळी आ. आनंदराव पाटील, पी. एन. पाटील, माजी आमदार उमाजी सनमडीकर, सदाशिवराव पाटील, हाफिज धत्तुरे, प्रकाश आवाडे, जयश्रीताई पाटील, उपमहापौर विजय घाडगे, पक्ष निरीक्षक विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वसंतदादांनी या राज्याचे नेतृत्व करून विकासाला एक नवी दिशा दिली आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दीचे कार्यक्रम राज्यभर मोठ्या प्रमाणात प्रदेश काँग्रेस करेल, अशी घोषणा अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. मंत्र्यांना नाही खात्री...राज्यातील सत्तेत आलेल्या भाजप सरकारमधील मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांनाही अजून आपण मंत्री झालो आहोत, याची खात्री वाटत नाही. वारंवार ते चिमटे काढून स्वत:ला विचारताहेत, असा टोमणा मोहन प्रकाश यांनी मारल्यानंतर उपस्थितांत हशा पिकला. गोपाळ शेट्टींचा निषेधआत्महत्या म्हणजे आता फॅशन आणि ट्रेंड झालेला आहे, असे मत व्यक्त करणाऱ्या भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांचा काँग्रेस नेत्यांनी निषेध केला. ही फॅशन असेल तर शेट्टी यांनीही ती अंगिकारावी, असा सल्ला मोहन प्रकाश यांनी दिला. ‘अरे गोप्या तुला हे शोभतं का?’, असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला, तर शेट्टी यांच्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. केविलवाणा मुख्यमंत्री पाहिला नाहीअधिकारी आपले काहीच ऐकत नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. अधिकारी ऐकत नसल्याचे सांगणारा इतका केविलवाणा मुख्यमंत्री आपण कधीही पाहिला नाही, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.