शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘मिरज मेडिकल’च्या लाचखोर प्रशासकीय अधिकाऱ्यास अटक

By admin | Updated: May 28, 2016 00:52 IST

पंधरा हजारांची रक्कम : सेवा पुस्तकाच्या प्रतीसाठी हेलपाटे

मिरज : मिरजेतील शासकीय वैद्यकीय महा-विद्यालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला शुक्रवारी १५ हजारांची लाच स्वीकारताना सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक केली. संजय रमण वाघमारे (वय ५४, रा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निवासस्थान, मिरज, मूळ रा. साई विघ्नहर्ता अपार्टमेंट, कामोठा, नवी मुंबई) असे त्याचे नाव आहे. कर्मचाऱ्याला सेवा पुस्तकाची प्रत देण्यासाठी व कर्जाकरिता अर्जावर सही-शिक्क्यासाठी वाघमारे याने ही लाच मागितली होती.वैद्यकीय महाविद्यालयातील ग्रंथालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून एका कर्मचाऱ्याची अनुकंपा तत्त्वावर दोन वर्षांपूर्वी नियुक्ती झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने महाविद्यालयाचा प्रशासकीय अधिकारी संजय वाघमारे याच्याकडे सेवा पुस्तकाची व सॅलरी अर्नर्स सोसायटीकडून सभासद कर्ज घेण्यासाठी अर्जावर सही-शिक्क्याची मागणी केली होती. मात्र, गेले आठ महिने त्याचे सेवा पुस्तक देण्यास वाघमारे टाळाटाळ करीत होता. याबाबत या कर्मचाऱ्याने चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय व्हनमाने यांना सांगितल्यानंतर, व्हनमाने यांनी वाघमारे याची भेट घेऊन संबंधित कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक तयार करून देण्याबाबत विनंती केली. वाघमारे याने सेवा पुस्तक तयार करण्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीने हा व्यवहार १५ हजारांत ठरला. याबाबत कर्मचारी संघटनेचे व्हनमाने व सुभाष थोरात यांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. (वार्ताहर)