शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे कोटीच्या कामांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:46 IST

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेच्या जवळपास दीडशे कोटीच्या कामांना ब्रेक लागला आहे. यात नगरोत्थान योजनेतून मंजूर ...

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेच्या जवळपास दीडशे कोटीच्या कामांना ब्रेक लागला आहे. यात नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या शंभर कोटीच्या निधीचाही समावेश आहे. याशिवाय समाजकल्याण, नगरसेवकांच्या स्थानिक विकास निधीतील कामेही आचारसंहितेच्या कात्रीत अडकली.महापालिकेला नगरोत्थान योजनेतून शंभर कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून २७८ कामांची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात रस्ते, गटारी, भाजी मंडई, नाट्यगृहाचे नूतनीकरण यासह अनेक कामांचा समावेश आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी ही कामे सुरू व्हावीत, यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी कमी कालावधी म्हणजे सात दिवस मुदतीची निविदाही काढण्यात आली. या निविदा प्रसिद्ध करून चार दिवस झाले आहेत. पण आचारसंहिता लागू झाल्याने निविदेची पुढील प्रक्रिया थांबणार आहे. आता ही कामे मे महिन्यातच सुरू होतील.जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला दलित वस्ती सुधारसाठी निधी मिळाला होता. गेल्यावर्षी ११.४५ कोटीचा निधी आला होता. पण हा निधी महापालिकेने वेळेवर खर्च न केल्याने पावणेसात कोटीचा निधी परत गेला आहे. आता उर्वरित पाच कोटीची कामे मार्चपर्यंत मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. पण आचारसंहितेमुळे ही कामेही कात्रीत सापडली आहे. नगरसेवकांच्या स्थानिक विकास निधीतून दोन लाखांच्या कामाच्या फायली मोठ्या प्रमाणात तयार आहेत. पण ही कामे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून थांबविली आहेत.महापालिकेच्या अंदाजपत्रकात नगरसेवकांसाठी दहा लाखाचा निधी देण्यात आला होता. या निधीतील कामांचे प्रस्तावही तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. गेल्याच आठवड्यात मंजुरीसाठी अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. काही कामांना आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविला, तर काही कामांच्या प्रस्तावांवर शेरे मारण्यात आले आहेत. या जवळपास सात ते आठ कोटीच्या कामांना ब्रेक लागला आहे.मे महिन्यात कामांचा धुरळामहापालिकेकडून तब्बल दीडशे कोटीची कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. काही कामांच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. पण आचारसंहिता लागू झाल्याने ही सर्व कामे थांबणार आहेत. मे महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू होतील. त्यामुळे पुढील दोन महिने प्रशासकीय स्तरावर सामसूमच राहणार आहे.बजेट अडकलेमहापालिकेचे बजेटही आचारसंहितेत अडकले आहे. प्रशासनाने साडेसातशे कोटीचे बजेट स्थायीकडे सादर केले होते. स्थायीकडून महासभेकडे बजेट गेलेले नाही. आता निवडणुकीनंतरच अंतिम बजेट सादर करावे लागणार आहे.