सांगली : शहरातील शंभरफुटी रोडवरील विद्युतपेटी तयार करण्याच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३१ हजार रुपयांचा माल लंपास केला. याप्रकरणी वसीम समद शेख (रा. पाकीजा मस्जीदजवळ, सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसीम शेख यांचे शंभरफुटी रोडवरील बावा मेगा माॅलमध्ये शेख इंडस्ट्रीज नावाने विद्युतपेट्या बनविण्याचा कारखाना आहे. बुधवार, दि. २५ रोजी रात्रीच्या सुमारास या ठिकाणी कोणी नसताना चोरट्यांनी शटरची दोन्ही कुलपे तोडून आत प्रवेश केला व आतील विद्युतपेट्या बनविण्याचे यंत्र, पत्रे कापण्याच्या कात्र्या, पत्र्याच्या पेट्या, लोखंडी सळई आदी माल लंपास केला. गुरुवारी सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर शेख यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली.