शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमावर खुद्द अध्यक्ष-उपाध्यक्षांचाच बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST

सांगली : जिल्हा परिषदेच्या सरपंच कार्यशाळेवर खुद्द अध्यक्ष-उपाध्यक्षांनीच बहिष्कार टाकला. भाजपच्या काही सदस्यांनीही पाठ फिरविली. कार्यशाळेला जयंत पाटील असल्याने ...

सांगली : जिल्हा परिषदेच्या सरपंच कार्यशाळेवर खुद्द अध्यक्ष-उपाध्यक्षांनीच बहिष्कार टाकला. भाजपच्या काही सदस्यांनीही पाठ फिरविली. कार्यशाळेला जयंत पाटील असल्याने बहिष्काराचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला होता.

कोरोना विषयावर मंगळवारी कार्यशाळा व आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका प्रदान कार्यक्रम झाला. पाटील यांच्यासह कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार सुमन पाटील आदी उपस्थित होते. मात्र, अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्यासह भाजपचे विषय सभापती व सदस्य गैरहजर राहिले. कार्यक्रम पत्रिकेवर उल्लेख होता शिवाय डिजिटलवर अग्रक्रमाने नावे होती, तरीही त्यांनी पाठ फिरविली. अजितराव घोरपडे गटाच्या आरोग्य व शिक्षण सभापती आशा पाटील तसेच भाजपचे समाजकल्याण सभापती प्रमोद शेेंडगे, सरिता कोरबू, मनोज मंडगनूर, अरुण बालटे, सरदार पटेल, संपतराव देशमुख हे मात्र उपस्थित होते. भाजप पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. खुद्द जयंत पाटील यांनीही भाषणादरम्यान दखल घेतली. कार्यक्रमाला अनुपस्थित असणाऱ्या अध्यक्षा कोरे यांचेही आभार असे वक्तव्य केले.

ते म्हणाले की, कार्यक्रमात अध्यक्षांसह सदस्यांची भेट होण्याची अपेक्षा होती. जिल्हा परिषदेचे प्रश्न समजले असते. मी जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने प्रश्न सोडविण्यासाठी मदत केली असती, पण सदस्य भेटले नाहीत. मला जिल्हा परिषदेत जायचेच आहे, तुम्ही बोलवाल तेव्हा येईन, असा टोलाही त्यांनी मारला.

महापालिकेत भाजपची सत्ता पाटील यांनी उलथवली आहे. जिल्हा परिषदेतही पदाधिकारी बदलाचे वारे वाहत असून जयंत पाटील येथेही गडबड करतील, अशी भाजप नेत्यांना भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हा परिषदेत यायचे आहे, असे वक्तव्य केल्याने सदस्यांमध्ये हशा पिकला.

चौकट

महापालिकेतील सत्ताकारणामुळे दांडी

पाटील यांनी महापालिकेत भाजपला पायउतार केल्याने भाजप श्रेष्ठींनी आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार जाहीर केला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या व महापालिकेच्या कार्यक्रमाला भाजप सदस्य गैरहजर राहिले. जिल्हा परिषदेतील बदलाला अनुकूल भाजप सदस्यच उपस्थित होते.