शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दैनंदिन परवाना शुल्कावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST

सांगली : उपयोगकर्ता कर, फेरीवाला धोरणप्रश्नी महापालिकेने संघटनेला दिलेले आश्वासन पाळले नसल्याने दैनंदिन परवाना शुल्कावर बहिष्कार टाकून असहकार आंदोलन ...

सांगली : उपयोगकर्ता कर, फेरीवाला धोरणप्रश्नी महापालिकेने संघटनेला दिलेले आश्वासन पाळले नसल्याने दैनंदिन परवाना शुल्कावर बहिष्कार टाकून असहकार आंदोलन सुरू केले आहे, अशी माहिती जनसेवा भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांनी दिली.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी संघटनेने उपयोगकर्ता कर, फेरीवाला धोरणप्रश्नी महापालिकेवर मोर्चा काढला होता. मोर्चाच्या शेवटी आणि उपोषण सोडण्यासाठी महापालिकेने आश्वासन दिले होते. आंदोलनानंतर आता ते आश्वासन पाळत नसल्यामुळे सोमवारपासून संघटना असहकार आंदोलन म्हणून दहा रुपयांची दैनंदिन परवाना पावतीवर बहिष्कार टाकला आहे. कुठलाही पथविक्रेता फेरीवाला भाजी विक्रेता महापालिकेस शुल्क देणार नाही.

संघटनेची सोमवारी बैठक पार पडली. त्यात काटकर म्हणाले की, आंदोलनाच्या बाबतीत महापालिका प्रशासनाची भूमिका ही दुटप्पी आहे. महापालिका प्रशासनाने २२ डिसेंबरपासून जी भूमिका घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नसल्यामुळे आम्हाला सहकार्य करण्याची त्यांची भूमिका नाही, असे ठाम मत झाले आहे. त्यामुळे जनसेवा भाजीपाला संघटनेने सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रातील महापालिका प्रशासनाला असहकार्याची भूमिका घेण्याचे ठरवले आहे. सर्व फेरीवाल्यांना, भाजी विक्रेत्यांना, पथविक्रेत्यांना आम्ही आवाहन करतोय की, रोज आपण जी १० रुपये भाड्याची पावती देतोय ते शुल्क कोणीही घ्यायचे नाही. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनप्रमाणे राज्य पातळीवरचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठवडाभरात मुंबईत नगरविकास मंंत्र्यांच्या दालनात बैठक होणार आहे. यासाठी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील प्रयत्नशील आहेत. जोपर्यंत बैठक होऊन त्यात निर्णय होत नाही तोपर्यंत प्रशासनाने घेतलेली चुकीची भूमिका शासन, धोरणांच्या विरोधात घेतलेली भूमिका याचा निषेध म्हणून संघटनेच्यावतीने असहकार आंदोलन सुरू केले आहे, असे काटकर यांनी सांगितले.