शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कडेगावात फेरपडताळणीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी दारूबंदीसाठी महिलांच्या सह्यांची फेरपडताळणी घेतली. यासाठी फक्त १६ महिला उपस्थित होत्या. दारूबंदी चळवळीतील कार्यकर्ते व महिलांनी फेरपडताळणीवर बहिष्कारामुळे, सह्यांच्या फेरपडताळणीस महिला उपस्थित राहिल्या नाहीत.राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३ आॅगस्टच्या सह्यांच्या पडताळणीत ८८ सह्यांचा गोलमाल केला. त्यावेळी झालेल्या सह्यांच्या पडताळणीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी दारूबंदीसाठी महिलांच्या सह्यांची फेरपडताळणी घेतली. यासाठी फक्त १६ महिला उपस्थित होत्या. दारूबंदी चळवळीतील कार्यकर्ते व महिलांनी फेरपडताळणीवर बहिष्कारामुळे, सह्यांच्या फेरपडताळणीस महिला उपस्थित राहिल्या नाहीत.राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३ आॅगस्टच्या सह्यांच्या पडताळणीत ८८ सह्यांचा गोलमाल केला. त्यावेळी झालेल्या सह्यांच्या पडताळणीचा निकाल जाहीर न करताच फेरपडताळणी कडेगावच्या दारूबंदी चळवळीवर लादली. त्यामुळे चळवळीतील कार्यकर्ते व महिलांनी संताप व्यक्त करून बहिष्कार टाकला.सोमवारी दिवसभर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सह्यांच्या फेरपडताळणीसाठी उपस्थित होते. कडेगाव नगरपंचायतीत टेबल मांडून यंत्रणा सज्ज ठेवली होती. मात्र बहिष्कार टाकल्यामुळे १६ महिलांव्यतिरिक्त कोणीही महिला सह्यांच्या पडताळणीसाठी फिरकल्या नाहीत.कडेगाव शहरात दारूबंदीसाठी ३ आॅगस्टरोजी पहिल्यांदा सह्यांची पडताळणी पूर्ण झाली होती. त्यावेळी १३३९ महिलांच्या सह्यांची पडताळणी झाली असल्याचे उत्पादन शुल्कच्या अधिकाºयांनी जाहीर केले होते. त्यावेळची चित्रफीत दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांकडे आहे. तरीही उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या अहवालात १२५१ महिलांच्या सह्यांची पडताळणी झाल्याचे नमूद केले आहे. यापैकी ११८९ सह्या बिनचूक ठरल्यास दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार होती. परंतु उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी ‘अर्थ’पूर्ण व्यवहारातून ३ आॅगस्टच्या सह्यांच्या पडताळणीत तब्बल ८८ सह्यांचा गोलमाल केला, असा आरोप दारूबंदी चळवळीतील कार्यकर्ते व महिलांनी केला आहे.उत्पादन शुल्कच्या अधिकाºयांनी फेरपडताळणीची पहिली तारीख नेमकी गौरी-गणपतीवेळी जाहीर केली होती. सणामुळे महिला येणार नाहीत, याच हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा शहरात होती. हा निर्णय चळवळीतील कार्यकर्त्यांच्या व महिलांच्या दबावामुळे रद्द झाला होता. त्याचवेळी महिलांनी, फेरपडताळणी नको, ३ आॅगस्टच्या पडताळणीचा निर्णय द्या आणि दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया राबवा, अशी मागणी केली होती. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा सोमवारी सह्यांची फेरपडताळणी जाहीर केली होती. मात्र महिलांनी त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारी सर्व टेबल मांडून महिलांची वाट पाहणाºया उत्पादन शुल्कच्या अधिकारी आणि कर्मचाºयांना, आपापसात गप्पा मारण्याशिवाय आणि मोबाईलशी खेळत बसण्याशिवाय काहीच काम नव्हते.दरम्यान, ३ आॅगस्टच्या सह्या पडताळणीचा काय घोळ झाला, याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडे जिल्हाधिकाºयांनी खुलासा मागितला असल्याचे समजते.चित्रफीत पाहून जिल्हाधिकाºयांनी कारवाई करावीउत्पादन शुल्क विभागाने गोलमाल करून दारूबंदी मोहिमेला खो घातला. गोलमाल करणाºया अधिकाºयांवर कारवाई करून दारूबंदीसाठी मतदान घ्यावे. ३ आॅगस्टरोजी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी १३३९ महिलांच्या सह्यांची पडताळणी झाल्याचे कॅमेºयासमोर जाहीर केले आहे. त्याची चित्रफीत उपलब्ध आहे. ही चित्रफीत पाहून जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.