शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुणदीत ट्रॅक्टरखाली सापडून मुलगा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:05 IST

कुंडल : पुणदी (ता. पलूस) येथे घराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर खेळत असताना अचानक ट्रॅक्टर जागेवरून पुढे आल्याने, प्रथमेश उमेश ...

कुंडल : पुणदी (ता. पलूस) येथे घराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर खेळत असताना अचानक ट्रॅक्टर जागेवरून पुढे आल्याने, प्रथमेश उमेश शेळके या आठ वर्षांच्या मुलाचा ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली सापडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. याबाबत संजय निवृत्ती शेळके यांनी कुंडल पोलिसांत फिर्याद दिली आहे.पुणदीतील लोककल्याण पतसंस्थेशेजारी शेळके कुटुंबीयांचे घर आहे. घरी आजी, आजोबा, आई, लहान बहीण असे कुटुंब असून, वडील उमेश शेळके यांचा दोन वर्षांपूर्वी दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे. प्रथमेश येथील क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयात शिकत होता. रविवारी सकाळपासून तो मित्रांबरोबर खेळत होता. दुपारी आई शुभांगी यांनी त्याला घरी जेवण्यासाठी बोलावून घेतले. जेवण झाल्यावर शुभांगी यांनी त्याला शेजारी मोहन यादव यांच्या घरी गेलेल्या आजीस बोलावून आणायला सांगितले. यादव यांच्या घरासमोर गावातीलच पोपट जाधव यांच्या मालकीचा ट्रॅक्टर उभा होता. आजीला हाक मारून प्रथमेश या ट्रॅक्टरवर चढला. ट्रॅक्टरमध्ये बसून तो स्टेअरिंग, अ‍ॅक्सिलेटर, गीअर शाफ्टसह खेळू लागला. खेळता-खेळता त्याने गीअर शाफ्ट न्यूट्रल केल्याने ट्रॅक्टर पुढे सरकू लागला. हे पाहून प्रथमेश घाबरला. काही कळण्यापूर्वीच जिवाच्या आकांताने त्याने ट्रॅक्टरवरून खाली उडी मारली. तो जमिनीवर पडताच ट्रॅक्टरचे मागील चाक त्याच्या अंगावरून गेले. पुढे निघालेला ट्रॅक्टर पाहून व प्रथमेशचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली; पण तोपर्यंत प्रथमेशच्या अंगावरून ट्रॅक्टर पुढे गेला होता. डोक्याला मार लागल्याने आणि अंगावरून चाक गेल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली होती. ग्रामस्थांनी तत्काळ त्याला उपचारासाठी हलविले; परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. प्रथमेशच्या अपघाती मृत्यूने पुणदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पलूस ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.दोन वर्षांपूर्वी वडिलांचा अपघाती मृत्यूप्रथमेशचे वडील उमेश शेळके यांचा दोन वर्षांपूर्वी दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. आता प्रथमेशच्या अपघाती मृत्यूने आई शुभांगी, लहान बहीण राधा, आजोबा माजी सैनिक विलास शेळके, आजी आशाताई यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.