शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रावळगुंडवाडीत दोन्ही पाणी योजना फोल

By admin | Updated: May 24, 2017 23:39 IST

रावळगुंडवाडीत दोन्ही पाणी योजना फोल

जयवंत आदाटे । लोकमत न्यूज नेटवर्कजत : तालुक्यातील रावळगुंडवाडी गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शिवकालीन पाणी साठवण योजना आणि जलस्वराज्य योजना याची अंमलबजावणी झाली आहे. परंतु गतवर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे दोन्ही योजना कुचकामी ठरल्या आहेत. सध्या १२ हजार लिटर क्षमतेच्या एका टॅँकरद्वारे रोज तीन खेपा करून गावासह तेथील चार वस्त्यांवर टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.रावळगुंडवाडीची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. २५ किलोमीटरवर असलेल्या बिरनाळ साठवण तलावातून टॅँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २००५-०६ या वर्षात शिवकालीन पाणी साठवण योजना अंमलात आणली होती. यावेळी सार्वजनिक इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवून जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला होता. त्यासाठी ८० हजार रुपये खर्च करण्यात आले होते. २०११-१२ या वर्षात गावातील सर्व इमारतीवरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यात आले होते. त्यासाठी १४ लाख रुपये खर्च करण्यात आले होते.२००८-०९ वर्षात रावळगुंडवाडी गावासाठी जलस्वराज्य योजना मंजूर झाली होती. या योजनेतून गावाच्या दक्षिण बाजूस सुमारे ५०० मीटर अंतरावर १२५ फूट खोल विहीर खोदून त्यातून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे विहिरीतील उद्भव बंद झाला आहे. विहिरीची आणखी खुदाई केल्यानंतर पाणी लागेल या आशेवर ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून विहिरीची खुदाई केली आहे. परंतु पाणी लागले नाही. २००४ चा अपवाद वगळता या गावाला मागील १५ वर्षांत एकदाही टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागला नाही.शिवकालीन पाणी साठवण योजनेचा गावाला निश्चित स्वरूपात फायदा झाला आहे. गाव टॅँकरमुक्त झाले होते. परंतु गतवर्षी पाऊस कमी पडल्यामुळे यावर्षी टॅँकरची मागणी करावी लागली आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच बसाप्पा सुतार व उपसरपंच आण्णाप्पा हिरगोंड यांनी व्यक्त केली. सध्या गावाला बिरनाळ साठवण तलावातून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. हे पाणी अशुद्ध आहे, ते शुद्ध केले जात नाही. तलावातून पाणी विद्युत मोटारीद्वारे उचलून टॅँकरमध्ये भरले जाते. तो टॅँकर २५ किलोमीटर अंतरावर नेऊन तेथे त्या पाण्याचे वाटप केले जाते. या पाण्यात टी. सी. एल. मिसळून त्याचे वाटप केले जाते, असा दावा प्र्रशासनाकडून केला जात आहे. परंतु २५ किलोमीटर अंतरावरून सतत ढवळून आलेल्या पाण्यात तात्काळ टीसीएल टाकून ते शुद्ध कसे होणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पिण्याच्या पाण्यासाठी चार किलोमीटरवर पायपीटटॅँकरद्वारे मिळणाऱ्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जात नाही. अंघोळ व इतर दैनंदिन वापरासाठी त्याचा उपयोग केला जात आहे. पिण्यासाठी तीन-चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणून त्याचा उपयोग नागरिक करत आहेत. टॅँकरद्वारे मिळणाऱ्या दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, अशी भीती नागरिक व्यक्त करत असले तरी, त्याची शक्यता कमी आहे, असा दावा सरपंच बसाप्पा सुतार व उपसरपंच आण्णाप्पा हिरगोंड यांनी केला आहे.