लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. आतापर्यंत ७ लाख नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्यापैकी १ लाख नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिनच्या उपलब्धतेनुसार लसीकरण सुरू आहे. त्यात कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा अधिक झाल्याने बहुतांश नागरिकांना हीच लस देण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत लस दिली जात आहे. महिन्याभरापासून लसीचा पुरवठा कमी प्रमाणात झाल्याने या मोहिमेला थोडा ब्रेकही लागला होता. तरीही जिल्ह्यातील सात लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. कोव्हिशिल्डचा पुरवठा जिल्ह्याला अधिक झाला आहे. त्यामानाने कोव्हॅक्सिनची लस कमी प्रमाणात उपलब्ध झाली. त्यामुळे सर्वाधिक कोव्हिशिल्डचेच लसीकरण झाले आहे.
चौकट
कोट
कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी परिणामकारक आहेत. या दोन्हीपैकी उपलब्ध लस नागरिकांना दिली जात आहे. कोव्हॅक्सिनचा पुरवठा तुलनेने कमी झाला. सध्या कोव्हॅक्सिनची लस केवळ दुसऱ्या डोससाठीच उपलब्ध करून दिली जात आहे. - डाॅ. विवेक पाटील, लसीकरण अधिकारी
चौकट
कोव्हिशिल्डच का?
१. कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी परिणामकारक आहेत. नागरिकांनी जी उपलब्ध असेल तरी लस देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
२. लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून कोव्हिशिल्डचा पुरवठा अधिक प्रमाणात झाला. त्या तुलनेत कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे कोव्हिशिल्ड लस घेण्याऱ्याचे प्रमाण अधिक आहे.
३. कोव्हिशिल्डचा दुसरा डोस ८४ दिवसानंतर, तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस २८ दिवसानंतर देण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या डोससोबतच दुसरा डोसही नागरिकांना मिळावा, असे प्रयत्न आहेत.
चौकट
एकूण लसीकरण
कोव्हिशिल्ड : ७,००,२५९
कोव्हॅक्सिन : ६०,१६१
चौकट
वयोगटानुसार लसीकरण
कोव्हिशिल्ड पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी : २६९५७ १५८९३
फ्रंटलाईन वर्कर्स : ३१३१२ १०५८९
१८ ते ४४ वयोगट : १५१७५ ६
४५ ते ५९ वयोगट : २७५३३८ २५८७८
६० वर्षावरील : २४६७४२ ५२३६९
-----------------------------------------------------------------------
कोव्हॅक्सिन पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी : १२८६ ६०३
फ्रंटलाईन वर्कर्स : २२९५ १२३३
१८ ते ४४ वयोगट : ६७२७ ५०७९
४५ ते ५९ वयोगट : ९४६६ ६६५८
६० वर्षावरील : १३०६८ १३७४६
-----------