सांगली : रायगड जिल्ह्यातून हरणांची तस्करी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या फिरोज कुडपकर व संजय धुमाळ या दोघांना न्यायालयाने १३ जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दोघांना घेऊन वन विभागाचे पथक रायगड जिल्ह्यात रवाना झाले आहेत. तेथील संशयित बुवानामक व्यक्तीचा शोध घेतला जाणार आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पेठ-इस्लामपूर (ता. वाळवा) येथे कुडपकर व धुमाळ यांना पकडले होते. त्यांच्याकडील मोटार व दोन हरणांची पाडसे ताब्यात घेतली होती. प्राथमिक चौकशीत त्यांनी ही पाडसे इस्लामपूर येथील एकाच्या मध्यस्थीने विक्री करण्यासाठी आणल्याचे स्पष्ट झाले होते. ते दोन्ही हरणांचा दहा लाखाला सौदा करणार होते, असे स्पष्ट झाले असले तरी ठोस माहिती मिळाली नाही. मुंबोशी (जि. रायगड) येथील बुवा नामक व्यक्तीने त्यांची हरणांची पाडसे विकत घेतल्याची माहिती पुढे आली होती. यामुळे बुवाचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.अटकेत असलेल्या कुडपकर व धुमाळ या दोघांना शुक्रवारी दुपारी न्यायालयात उभे केले होते.
हरणांच्या तस्करीप्रकरणी दोघांना कोठडी
By admin | Updated: June 13, 2015 00:14 IST