शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

दोघे संशयित दोषमुक्त

By admin | Updated: May 1, 2016 00:26 IST

इस्लामपूर : डॉक्टर दाम्पत्य खून प्रकरण

इस्लामपूर : इस्लामपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यास हादरवून सोडणाऱ्या डॉ. प्रकाश व डॉ. अरूणा कुलकर्णी या दाम्पत्याच्या खुनप्रकरणातील दोघा संशयितांना शनिवारी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सौ. सी. एच. चव्हाण यांनी फौजदारी संहिता कलम १६९ अन्वये दोषमुक्त केल्याचा निकाल दिला. त्यामुळे आता एकाच संशयिताविरोधात या दुहेरी खून खटल्याचे कामकाज चालणार आहे. निलेश भास्कर दिवाणजी (वय २९) व सीमा बाळासाहेब यादव (वय ३६, रा. दोघेही शिवनगर, इस्लामपूर) अशी दोषमुक्त करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. डॉ. प्रकाश वामन कुलकर्णी (वय ६५) व डॉ. अरूणा प्रकाश कुलकर्णी (वय ५८, रा. जावडेकर चौक, इस्लामपूर) या दोघांचा त्यांच्याच धारित्री क्लिनिक या रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील निवासस्थानी धारधार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला होता. ही घटना १९ डिसेंबर २०१५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. ती दुसऱ्या दिवशी २० डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत संदीप वामन कुलकर्णी (वय ५२, रा. मंत्री कॉलनी, इस्लामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने निलेश दिवाणजी, परिचारिका सीमा यादव या दोघांसह अर्जून रमेश पवार (वय १७, रा. हनुमाननगर, इस्लामपूर) या तिघांना अटक करून त्यांच्याकडे तपास केला. या तपासादरम्यान दिवाणजी आणि सीमा यादव यांच्याविरोधात पुरावे आढळून न आल्याने २८ मार्च रोजी येथील न्यायालयात त्या दोघांना दोषमुक्त करावे, असा अहवाल दिला . त्याचवेळी अर्जून पवार याच्याविरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अहवालावर फिर्यादीचे म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार फिर्यादी संदीप कुलकर्णी यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. सरकार पक्ष आणि बचाव पक्षाचे वकील विजय काईंगडे यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निलेश दिवाणजी व सीमा यादव यांना दोषमुक्त करण्याचे आदेश दिले.