शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसचे प्रयत्न

By admin | Updated: March 3, 2017 23:44 IST

जिल्हा परिषदेतील सत्तेचा पेच : राष्ट्रवादीकडूनही जुळवाजुळव; भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड दि. २१ मार्च रोजी होत आहे. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सत्तेचा दावा केला असून त्यांना रोखण्यासाठी भाजपच्या नेत्यांचीही रयत विकास आघाडी आणि शिवसेनेशी बोलणी चालू आहेत.जिल्हा परिषदेत बहुमत सिध्द करण्यासाठी ३१ संख्याबळ पक्षाकडे असण्याची गरज आहे. या आकड्याची जुळवाजुळव करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही खूप कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसकडे १० आणि राष्ट्रवादीकडे अपक्षासह १५ अशी २५ सदस्यांची संख्या आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे आमचेच असून ते कुठेही जाणार नाहीत, असा ठाम विश्वास राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. घोरपडे गटाच्या दोन सदस्यांसह दोन्ही काँग्रेसकडे २७ सदस्यसंख्या होत आहे. बहुमत सिध्द करण्यासाठी दोन्ही काँग्रेसला पुन्हा चार सदस्यांची गरज आहे. यासाठी खरे प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने रयत विकास आघाडीतील नानासाहेब महाडिक गटाच्या तीन सदस्यांवर डोळा ठेवला आहे. महाडिक गटाशी बोलणीही चालू आहेत. परंतु, महाडिक गटाकडेही भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जोरात फिल्डिंग लावली आहे. यामुळे महाडिक गटाशिवाय अन्य सदस्य कसे मिळतील, याचा काँग्रेस नेते प्रयत्न करीत आहेत. रयत आघाडीतील कामेरी (ता. वाळवा) आणि वाळवा गट अशा दोन सदस्यांना काँग्रेसकडे खेचण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न चालू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सदस्यही काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. तरीही काँग्रेसचा बहुमताचा आकडा ३१ पर्यंत पोहोचत नसल्यामुळे पुन्हा त्यांना महाडिक अथवा शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्याशी चर्चा करावीच लागणार आहे.भाजपची २५ सदस्यसंख्या असून रयत विकास आघाडी चार आणि शिवसेना तीन अशी त्यांची ३२ सदस्यसंख्या होत आहे. रयत आघाडीचे कामेरी आणि वाळवा गटातील सदस्य भाजपबरोबर राहतील, अशी शक्यता कमी आहे. यामुळे त्यांची पुन्हा दोन सदस्यसंख्या कमी होऊन ते ३० पर्यंतच राहणार आहेत. घोरपडे गटाशी भाजप बोलणी करणार आहे. पण, भाजपचे खासदार संजयकाका पाटील गटाचे घोरपडे गटाशी जमत नसल्यामुळे, ते किती साथ देतील हे निवडीवेळीच स्पष्ट होणार आहे.दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी नूतन सदस्य आणि कोअर कमिटीच्या नेत्यांची दि. ४ रोजी मिरजेत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीतच सत्ता स्थापण्याचे गणित निश्चित होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)रयत आघाडी सदस्यांचा : काँग्रेसकडून सत्काररयत विकास आघाडीचे सर्व चार सदस्य आमचेच आहेत, असे भाजपचे नेते सांगत आहेत. परंतु, दुसऱ्या बाजूला रयत विकास आघाडीचे सम्राट महाडिक यांनी त्यांच्या तीन समर्थक सदस्यांसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. यावेळी नूतन सदस्यांचा कदम यांच्याहस्ते सत्कारही करण्यात आला. यामुळे रयत विकास आघाडीच्या सदस्यांचा पाठिंबा नक्की कुणाला मिळणार?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. येत्या दि. २१ मार्च रोजीच रयत आघाडीचा पाठिंबा कुणाला मिळाला, हे निश्चित होणार आहे.