शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही कॉँग्रेस नेत्यांची भाजपकडे उमेदवारीची मागणी

By admin | Updated: August 3, 2014 01:50 IST

पक्षनिरीक्षक सांगलीत : कोणाचीही उमेदवारी निश्चित नाही; जगताप, घोरपडे, डोंगरे यांचा समावेश

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी (पप्पू) डोंगरे यांनी भाजप पक्षनिरीक्षकांची आज (शनिवार) भेट घेऊन भाजपकडून उमेदवारीची मागणी केली. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली. भाजपचे पक्षनिरीक्षक संभाजीराव पाटील-निलंगेकर, माजी आ. विजय गव्हाणे यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. अद्याप कोणाचीही उमेदवारी निश्चित झालेली नाही, एवढेच ते पत्रकार परिषदेत म्हणाले. सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघामधील भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीसाठी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आज (शनिवार) भाजपचे निरीक्षक निलंगेकर, गव्हाणे सांगलीत आले होते. आज सकाळपासून इच्छुकांशी चर्चा सुरू होती. यामुळे विश्रामगृहाच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी आमदार संभाजी पवार, शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, नीता केळकर, पृथ्वीराज पवार आदी उपस्थित होते. भाजप पक्षनिरीक्षकांना माजी मंत्री अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, शिवाजी डोंगरे आदींची भेट घेतली. त्यांच्या चर्चेचा तपशील मात्र मिळू शकला नाही. इच्छुकांबरोबर बंद खोलीत चर्चा करण्यात येत होती. आठही विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली होती. त्यानंतर पक्षनिरीक्षकांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. पत्रकार परिषदेत निरीक्षक पाटील-निलंगेकर व विजय गव्हाणे म्हणाले की, जिल्ह्यातील आठही विधानसभा क्षेत्रासाठी प्रत्येकी पाच ते सहा इच्छुकांनी आपणाकडे अर्ज केला आहे. काहीजणांनी थेट राज्यपातळीवरील पक्षनेत्यांकडे उमेदवारीची मागणी केली आहे. याठिकाणचा अद्याप कोणताच उमेदवार निश्चित केलेला नाही. आम्ही आजचा अहवाल पक्षाध्यक्षांकडे सादर करणार आहे. उमेदवार कोण असणार, याची निश्चिती जनतेमध्ये सर्व्हे करुन राज्यपातळीवर पक्ष संघटना करणार आहे. आम्ही फक्त येथील अहवाल देणार आहे. संभाजी पवार यांचेही मत जाणून घेण्यात आले आहे. इतर आमदारांनी थेट पक्ष नेत्यांबरोबर चर्चा केली आहे. सर्वच इच्छुकांनी महायुतीने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे राहणार असल्याची ग्वाही दिल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)