शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

दोघे उच्चशिक्षित, तर चौघे पदवीधर

By admin | Updated: October 21, 2014 22:44 IST

पतंगराव सर्वात ज्येष्ठ आमदार : सहाजण शेतकरी

सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आठ आमदारांपैकी दोघे उच्चशिक्षित, तर चौघेजण पदवीधर आहेत. त्याचबरोबर सहाजणांचा व्यवसाय शेती असून, इतर दोघे मात्र व्यावसायिक आहेत. पतंगराव कदम सर्वात ज्येष्ठ आमदार ठरले असून, जयंत पाटील हे सर्वात कमी वयाचे आमदार ठरले आहेत. नवनिर्वाचित आमदारांचे शिक्षण, वय आणि व्यवसायाचा आढावा घेतला असता, यामध्ये दोन आमदार व्यावसायिक असल्याचे, तर उर्वरित सर्व शेतकरी असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील बावीस लाख मतदारांनी १०७ उमेदवारांतून आठजणांची निवड केली आहे. यामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ व जतमधून विलासराव जगताप हे पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश करीत आहेत. इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील व तासगाव मतदारसंघातून आर. आर. पाटील हे सलग सहाव्यांदा विधानसभेत प्रवेश करीत आहेत. तसेच पतंगराव कदम पलूस-कडेगाव मतदारसंघातून सहाव्यांंदा विधानसभेत प्रवेश करीत आहेत. शिराळा मतदारसंघातून चौथ्यांदा शिवाजीराव नाईक निवडून आले आहेत. खानापूर-आटपाडी मतदारसंघातून अनिल बाबर तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. मात्र दोघांचा प्रवास अखंडित आहे. सुरेश खाडे हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले असले तरी, त्यांचा पहिल्यांदा मतदारसंघ जत होता व नंतरची दोन वेळची आमदारकी ही मिरजेतून आहे. जिल्ह्यातील आठपैकी केवळ दोनच आमदार पहिल्यांदा विधानसभेत जात आहेत. इतर सहाजणही तीनपेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. खानापूर-आटपाडी मतदारसंघातून अनिल बाबर यांना पंधरा वर्षांच्या काळानंतर आमदारकी मिळाली आहे. (प्रतिनिधी)आमदारवयशिक्षणव्यवसायसुधीर गाडगीळ६१बी. कॉम.व्यापारसुरेश खाडे५६एस.एस.सीशेतीविलासराव जगताप६६अभियंता (पदविका) लॉजिंगआर. आर. पाटील५६बी.ए. एल.एल.बी.शेतीजयंत पाटील५२बी.ई. सिव्हिलशेतीशिवाजीराव नाईक६९बी.एस्सी. (केमिस्ट्री)शेतीडॉ. पतंगराव कदम७०एम.ए. एल.एल.बी.शेती अनिल बाबर६४बी.ए.शेती