शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 16:02 IST

क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या ३५ व्या हंगामाचे बॉयलर अग्नीप्रदीपन सोमवारी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले.

ठळक मुद्देकेंद्राची धोरणे, आयकरामुळे ऊसदराला वेसण  : वैभव नायकवडीहुतात्मा साखर कामगारांकडून एक कोटीची गाडीशासनाच्या आदेशाप्रमाणे १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरूप्रथेप्रमाणे आज महात्मा गांधी जयंतीदिनी सुर्योदयाला कारखान्याचे बॉयलर अग्नीप्रदीपन

वाळवा : केंद्र सरकारने आठ लाख टन साखर आयात केली नसती, तसेच कारखान्यांवर साखर साठ्याबाबत बंधने लादली नसती, तर ‘हुतात्मा’ला आणखी दर देणे शक्य झाले असते. साखर उद्योगावरील आयकरही जादा दरासाठी अडचणीचा ठरत आहे, असे प्रतिपादन हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.

क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या ३५ व्या हंगामाचे बॉयलर अग्नीप्रदीपन सोमवारी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी आयोजित जाहीर सभेत नायकवडी बोलत होते.

यावेळी कुसुमताई नायकवडी, वंदना माने, विशाखा कदम, महादेव कांबळे, महमद चाऊस, किरण नायकवडी, नंदिनी नायकवडी, वीरधवल नायकवडी, प्रभारी कार्यकारी संचालक दीपक पाटील, शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

नायकवडी म्हणाले, क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखान्याच्या प्रथेप्रमाणे आज महात्मा गांधी जयंतीदिनी सुर्योदयाला कारखान्याचे बॉयलर अग्नीप्रदीपन करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यात येईल.

प्रा. बाळासाहेब नायकवडी म्हणाले, वैभव नायकवडी हे भविष्याचे वेध घेणारे अत्यंत वैचारीक व वैज्ञानिक कसोटीवरील चिकित्सक नेतृत्व आहे. हुतात्माच्या माध्यमातून इथेनॉल प्रकल्प उभारून तो कार्यान्वित करण्यापूर्वीच कर्जमुक्त करणे, हे केवळ वैभव नायकवडी यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाले आहे.

कामगारांकडून एक कोटीची गाडीयावेळी हुतात्मा साखर कामगारांतर्फे वैभव नायकवडी यांना एक कोटी रूपये किमतीची आलिशान मोटार भेट देण्यात आली. कुसुमताई नायकवडी यांनी गाडीच्या चाव्या वैभव नायकवडींकडे सोपविल्या. यावेळी कुसुमताई म्हणाल्या, गरीब, कष्टकरी दैवत मानून हुतात्मा कारखाना उभा केला आहे. ऊस उत्पादकांना योग्य दर, कामगारांना वेतन व बोनस नियमितपणे देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावला.त्यांना विश्वास दिला. या विश्वासाचे प्रतिक म्हणून कामगरांनी वैभवला गाडी प्रदान  केली आहे. यापुढेही हा विश्वास कायम राहावा. ‘टीम वर्क’च्या माध्यमातून कारखान्याच्या, पर्यायाने शेतकरी, कष्टकºयांच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे